Nashik News : विणकरांना लाभासाठी मिळेल ओळखपत्र! केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाची टीम येवल्यात | Weavers will get identity card for benefits team from the Union Ministry of Textiles arrived Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Officials of Handloom Department while speaking at the Weavers Identity Card distribution program

Nashik News : विणकरांना लाभासाठी मिळेल ओळखपत्र! केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाची टीम येवल्यात

Nashik News : विणकरांना शासकीय योजनांसह व वित्तीय साहाय्य मिळवण्यासाठी लागणारे विणकर ओळखपत्र उपलब्धतेसाठी सर्वेक्षण कार्यक्रम वंचित व नवीन विणकरांसाठी पुन्हा सुरु करण्यात आला आहे.

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचे चार अधिकाऱ्यांचे पथक येवल्यात दाखल झाले आहे. शहर व तालुक्यातील विणकर बांधवांना शंभर टक्के ओळखपत्र देण्यासाठी उद्घाटन व नोंदणी कार्यक्रमानंतर सर्वेक्षणाचे काम देखील तत्काळ सुरु झाले आहे. (Weavers will get identity card for benefits team from the Union Ministry of Textiles arrived Nashik News)

येथील चौंडेश्वरी मंदिरात विणकरांच्या कार्यक्रमात राष्ट्रीय हातमाग विकास महामंडळ अधिकारी उपेंद्र बहिरे, विणकर सेवा केंद्र सहाय्यक अधिकारी व्ही. एस. यादव, उपायुक्त कार्यालय मुंबईचे तांत्रिक सहाय्यक प्रादेशिक शिवानंद वर्मा, विणकर सेवा केंद्र परिचर तानाजी भोईटे, व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते दत्ता महाले, परदेशी, भाजप विद्यार्थी आघाडीचे प्रमुख समीर सामदडीया, ओबीसी संघ मोर्चा जिल्हा सरचिटणीस राजू उपस्थित होते.

श्री. बहिरे, श्री. यादव यांनी विणकर ओळखपत्रासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे व विविध योजनांसाठी विणकर ओळखपत्र किती गरजेचे आहे. याबाबत माहिती देत थेट सर्वसामान्य विणकरांना हे ओळखपत्र थेट सर्वेक्षण करून देणार असल्याचे सांगितले.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या माध्यमातून या उपक्रमाला चालना मिळाली आहे. श्री. पवार यांचे स्वीय सहाय्यक डॉ. उमेश काळे यांनी केंद्रीय वस्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांना विनंती करून कॅम्पचे थेट आयोजन मंत्री पवार यांनी येवल्यात केल्याचे सांगितले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

विणकरांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे काळे म्हणाले. महाले, परदेशी यांनी विणकरांसाठी स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले. केंद्रशासनाने सर्वसामान्य कार्डधारक विणकरांना अनुदानावर रेशीम विक्री करण्यासाठी डेपो उघडावा अशी मागणी केली.

विणकर ओळखपत्रावर कॅशक्रेडीट व विविध शासकीय कर्ज व अनुदान योजनांचा लाभ देण्याचे आवाहन केले. भाजप जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे यांनी मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. विणकर समाजाच्या हितासाठी विविध योजनांचा लाभ मिळावा म्हणून केंद्रीय मंत्रालयात पाठपुरावा करून विणकर ओळखपत्र निर्मिती मेळावा घेतल्याचेही सांगितले.

राष्ट्रपती पुरस्कार विजेते रमेश परदेशी, शांतिलाल भांडगे यांनी मनोगत व्यक्त केले. युवराज पाटोळे, चेतन धसे, नीलेश परदेशी, संतोष नागपुरे, वीरेंद्र मोहरे, संतोष काटे आदीची उपस्थिती होती. गणेश खळेकर यांनी सूत्रसंचालन केले. आनंद शिंदे यांनी आभार मानले.

टॅग्स :NashikUnion Ministry