wedding vivant resort
wedding vivant resortesakal

मुंबई-नाशिक महामार्गावरील विवांत रिसॉर्टमध्ये नियमांची पायमल्ली

इगतपुरी शहर ( जि.नाशिक) : येथील मुंबई- नाशिक महामार्गावरील (mumbai-nashik highway) विवांत पंचतारांकित रिसॉर्ट येथे विवाह सोहळा (wedding ceremony) रविवारी (ता.३०) संपन्न झाला. सोहळ्यास शंभराहून अधिक वाहने येथे आली असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. (wedding-ceremony-100-people-presense-vivant-resort-nashik-marathi-news)

कोरोनाचे रुग्ण वाढत असताना स्थानिक प्रशासनाकडून डोळे झाक?

तालुक्यात कोरोनाचे रुग्ण ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वाढत असताना स्थानिक प्रशासन डोळे झाक करताय की काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे याच ठिकाणी शनिवारी (ता.२९) विवाह सोहळा पार पडला.यातही मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र याची कुणकुण प्रशासनाला लागल्याने तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी स्वत: जात कारवाई करत २५ हजार रुपयाचा दंड ठोठावला. मात्र रविवार (ता.३०) पुन्हा मोठ्या प्रमाणात लग्नासाठी गर्दी झालेली असताना याची स्थानिक प्रशासनाला कुणकुण लागू नये, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, पत्रकारांनी बातमी संकलनासाठी प्रवेश मागितला असता प्रवेश नाकारण्यात आला.

wedding vivant resort
लॉकडाउन काळात 'या' कंपनीत घसघशीत वेतनवाढ! मेडिक्लेमची सुविधा
wedding vivant resort
‘ॲम्फोटेरिसिन बी’च्‍या ‘मोफत-विकत’चे गौडबंगाल; ‘एमआरपी’मध्ये विक्री कशी?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com