आषाढातही शुभमंगल सावधान! न होणाऱ्या मुहूर्तांवरही लग्ने

wedding
weddingesakal

देवळा (जि.नाशिक) : कोरोनामुळे (coronavirus) यंदा लांबलेली लग्ने आषाढातही केली जात आहेत. कोरोना जाण्याचे नाव घेत नसल्याने मग थोडक्यात का होईना पण उरकून घेऊ, असे म्हणत सध्या आषाढ महिन्यातील मुहूर्तांवर लग्न (wedding) उरकली जात आहेत. वर-वधू पसंतीचा भाग होऊन कोरोना संपल्यावर धुमधडाक्यात लग्न काढू, असे म्हणणारे आता लग्नमुहूर्त शोधत विवाह समारंभ उरकण्यावर भर देत आहेत. (Weddings-in-seoson-too-due-corona-marathi-news-jpd93)

न होणाऱ्या मुहूर्तांवरही यंदा लग्ने

कोरोनाचा कहर थोडा कमी झाल्याने व काही अंशी निर्बंध शिथिल झाल्याने मोजके पाहुणे व वऱ्हाडींच्या उपस्थितीत तसेच लग्नसमारंभातील प्रथांना फाटा देत कमी खर्चात व थोडक्यात लग्न होत आहेत. कोरोनामुळे यंदा उशिरा अर्थात आषाढ महिन्यात लग्ने होत आहेत. आषाढ महिन्यातही विवाहमुहूर्त आहेत, त्यामुळे विवाह समारंभ होत आहेत, असे पुरोहित राहुल वाघमारे यांनी सांगितले. लग्न ठरले की ते लगेचच उरकलेले चांगले असते. विनाकारण खर्च होणारा पैसा या नवदांपत्यास दिल्यास त्यांची प्रगती होण्यास हातभार लागू शकतो. त्यामुळे आषाढ महिन्यात लग्न करणेही चांगलेच आहे, असे डॉ. राजेंद्र गुंजाळ यांनी सांगितले.

wedding
नाशिक नोटप्रेस चोरी प्रकरण : आणखी 7 जण निलंबित
wedding
नाशिक, इगतपुरीत ‘CBI’चे छापे; अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com