फोटो काढणे बेतले जीवावर; सोमेश्वरला पाय घसरून नदीपात्रात पडल्याने युवतीचा मृत्यु : Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

death

Nashik News : फोटो काढणे बेतले जीवावर; सोमेश्वरला पाय घसरून नदीपात्रात पडल्याने युवतीचा मृत्यु

नाशिक : मित्रांसमवेत सोमेश्वर धबधबा येथे फिरण्यासाठी आलेली युवती फोटो काढत होती. त्यावेळी तिचा पाय घसरला आणि ती नदीपात्रात पडल्याने तिच्या दुर्दैवीरित्या मृत्यु झाल्याची घटना घडली. (while taking photo young girl died after her foot slipped and fell into river at Someshwar dam Nashik)

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

शिवांगी जयशंकर सिंह (२१, रा. उज्ज्वलनगर, माळेगाव एमआयडीसी, सिन्नर) असे मयत युवतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी व तिचा मित्र आदित्य देवरे हे सोमेश्वर धबधबा येथे फिरण्यासाठी आले होते.

त्यावेळी सोमेश्वर धबधब्याजवळ शिवांगी मित्रासमवेत फोटो काढत असताना तिचा पाय घसरला आणि तोल जाऊन ती गोदावरी नदीपात्रात पडली. यावेळी तेथे उपस्थित नागरिकांनी तिला नदीपात्रातून बाहेर काढून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैदयकीय अधिकार्यांनी तपासून मयत घोषित केले. सहायक उपनिरीक्षक वाय.एस. आहिवळे हे तपास करीत आहेत. याप्रकरणी गंगापूर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :NashikDeath by drowning