
Summer Heat : उन्हाची दाहकता; जागोजागी कलिंगड, फळांची विक्री, रसवंतिगृहात होऊ लागली गर्दी
सिन्नर (जि. नाशिक) : मकर संक्रांतीला सूर्याचा (Sun) मकर राशीत प्रवेश होऊन उत्तरायणाला सुरवात होते.
त्या दिवसापासून दिवस मोठा व रात्र लहान होऊन सूर्याची लंबरूप किरणांमुळे उन्हाची दाहकता वाढत जाते. (With onset of summer in rural areas of Sinnar taluka heaps of Kalingada fresh sugarcane juice are seen for sale on streets nashik news)
साहजिकच ही उन्हाळ्याची चाहूल मानवी वर्तनावर परिणामकारक ठरते व त्यामुळे सगळीकडे ऊन जाणवू लागते. सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागात उन्हाळ्याची चाहूल लागल्याने कलिंगडाचे ढीगच्या ढीग, उसाचा ताजा रस रस्त्यावर विक्रीसाठी दिसत आहेत. सूर्य जसा डोक्यावर येतो तसतशा उन्हाच्या गरम झाला अंगाची लाही लाही करू लागतात.
रस्त्याच्या कडेला जी काही थोडीफार झाडी आहे, त्यांचीही पानगळ झाल्याने पादचाऱ्यांना सावलीचा आडोसा शोधूनही सापडत नाही. परंतु असे असले तरी उन्हाळ्यामध्ये जी काळजी घ्यावी, तशी काळजी घेताना नागरिक दिसत आहेत.
दुचाकीस्वार पूर्ण अंग झाकेल असे वस्त्र परिधान करीत आहेत. रस्त्याच्या कडेला चहाऐवजी लिंबू सरबत, उसाच्या गाड्यांवर त्याचा आस्वाद घेत आहेत. द्राक्षे, कलिंगड यांसारखी सिझनेबल फळांची आवक वाढू लागली आहे.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
"दिवसोंदिवस तापमानात वाढ होत असल्याने उसाचा ताजा रस, लिंबू सरबत तसेच कलिंगड हे पदार्थ घेतल्याने उष्णतेची दाहकता कमी होते. उष्णतेचा बचाव करण्यासाठी अंगभर कपडे वापरावे तसेच सफेद कपड्यांचा वापर करावा. लहान मुले तसेच ज्येष्ठांनी बाहेर पडू नये."-अक्षय भगत (नागरिक)
"सिन्नर तालुक्यात अनेक नागरिकांनी एकत्र येत फाउंडेशनच्या माध्यमातून डोंगर, मोकळ्या मैदानात, रस्त्यांच्या कडेला अनेक ठिकाणी झाडे लावलेली असून. त्याचे संगोपन करण्याचे कामही हे फाउंडेशन करीत आहे. सिन्नरच्या तरुणाईने वृक्ष लावा वृक्ष जगवा या वाक्याप्रमाणे अनेक ठिकाणी वृक्षारोपण करून सामाजिक संदेश दिला आहेत." -विष्णू वाघ, वृक्षमित्र