नाशिक : महिलेची सोनसाखळी ओरबडणाऱ्या भामट्याला कारावास

chain snatching
chain snatchingesakal

नाशिक : पंचवटीत महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबडणाऱ्या तिघांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नईम मेहबूब सय्यद (वय ३०, अचानक नगर, श्रीरामपूर जि.नगर) असे शिक्षा लागलेल्या आरोपीचे नाव आहे. कोर्ट सातच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी (Additional Chief Justice) प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.

chain snatching
Osmanabad Crime | कळंबमध्ये धाडसी चोरी; दोन एटीएम फोडून २१ लाखांची चोरी

मागील वर्षी १० फेब्रुवारीला सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास पंचवटीत (Panchavati) नवीन मार्केट यार्डाच्या मागे तुळजाभवानी नगर भागात रंजना दत्तात्रय पवार (वय ४७) या जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या नईम सय्यद व ट्रिपल एक्स ऊर्फ रॉकी ऊर्फ बाल्या ऊर्फ बलराम यादव (दोघेही श्रीरामपूर जि.नगर) यांनी दुचाकीवरून मावशी असा आवाज दिला. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या नईम याने महिलेच्या गळ्यातील ११ ग्रॅमची सोन्याची पोत ओबरडून नेली होती. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

chain snatching
Gold Rate Today : सोन्याच्या भाव घसरला, चांदीही झाली स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

सहाय्यक निरीक्षक ( Assistant inspector) आर.के. बागूल यांनी संशयित आरोपीविरोधात सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. न्यायालयात संशयिताविरोधात आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने नईम याला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. ॲड एस.जे. बागडे सरकारी पक्षातर्फे यांनी कामकाज पाहिले. कोर्ट अंमलदार आर.के. सोनवणे, हवालदार पी.पी. गोसावी यांनी पाठपुरावा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com