Nashik News : रणरागिणींनी पकडली अवैध दारू; जालखेड येथील विक्रेता पोलिसांच्या ताब्यात

Liquor seized by women of women's self-help group in Jalkhed on Thursday.
Liquor seized by women of women's self-help group in Jalkhed on Thursday.esakal

Nashik News : जालखेड (ता. दिंडोरी) येथील बचत गटाच्या महिलांनी दारू विक्रेत्याला रंगेहात पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. (women caught illegal liquor seller at Jalkhed is in custody of police Nashik News)

जालखेड येथे दारू विक्रीमुळे गावातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शाळेत जाणारी लहान-लहान मुले व अनेक तरुण मंडळी व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. याबाबत अनेक वेळा ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन तक्रारी नोंदविल्या, तसेच दिंडोरी पोलिसांना वेळोवेळी निवेदनही दिले आहे.

परंतु कारवाई झाली नाही. गावातील बचत गटाच्या महिलांनी गुरुवारी सकाळी अकराला दारू विक्रेत्याला चोप दिला. त्यानंतर दिंडोरी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले.

तालुक्यातील उमराळे बु, गोळशी, लखमापूर, मोहाडी, आंबेदिंडोरी, वरखेडा, पालखेड बंधारा आदी परिसरात मोठ्या प्रमाणात दारू विक्री केली जात आहे. आतापर्यंत सर्वात जास्त कारवाई दिंडोरी तालुक्यात करण्यात आली आहे.

आता तरी स्थानिक पोलिसांनी कारवाई न केल्यास तालुक्यातील दारू विक्रेत्यांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा येथील महिला वर्गाने दिला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मंगला मडके, अंजना झनकर, शांताबाई झनकर, रेखा इंगळे, गंगूबाई शेखरे, योगिता चौधरी, सुरेखा झनकर, राजश्री भुरकुड, कमल झनकर, अश्‍विनी इंगळे, रोहणी चौधरी, ताईबाई झनकर, संगीता गायकवाड, सविता चौधरी, वैशाली चौधरी, इंदूबाई इंगळे, अनिता रोकडे, रेश्मा इंगळे, गायश्री शेवरे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.

"महिला अनेक वेळा दारू पकडून देतात. मात्र गुन्हा दाखल करून दारू विक्रेत्यांना सोडले जाते. त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. तालुक्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे."-ज्योती देशमुख, लखमापूर

"अनेक वेळा दारुविक्रेत्याला जालखेड येथील महिलांनी व पोलिसांनी दारू विक्री बंद करण्याचे सांगितले होते. मात्र त्याने ऐकले नाही. त्यामुळे त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी."- योगिता चौधरी, जालखेड

Liquor seized by women of women's self-help group in Jalkhed on Thursday.
Summer Drinks : उन्हाळ्याच्या काहिलीने शीतपेयांना मागणी वाढली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com