Womens Day 2023 : सामान्य महिलाच पोस्टाच्या खऱ्या ग्राहक! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

In-charge Postmaster Prashant Kapote felicitating women present on the occasion of Women's Day at the Post Office.

Womens Day 2023 : सामान्य महिलाच पोस्टाच्या खऱ्या ग्राहक!

सिन्नर (जि. नाशिक) : भारतात टपाल (Post) खात्याची नाळ तळागाळातील महिलांशी जुळली आहे. टपाल सुविधांचा सर्वाधिक लाभ महिलाच घेत असून, सर्वसामान्य कुटुंबातील या महिला पोस्टाच्या खऱ्या अर्थाने ग्राहक आहेत,

असे प्रतिपादन सिन्नर टपाल कार्यालयातील प्रभारी पोस्टमास्तर प्रशांत कपोते यांनी केले. (Womens Day 2023 Ordinary women are real customers of Post office nashik news)

जागतिक महिला दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ग्राहक म्हणून आलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. कार्यालयातील महिला कर्मचारी जया मुरकुटे अध्यक्षस्थानी होत्या. तालुक्यातील अनेक महिलांचा हिरकणी उपाधीने सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ कर्मचारी मनोज निरगुडे यांनी महिला शिकली पाहिजे, महिलांना पुरुषांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा, असे आवाहन केले.

श्री. कपोते यांनी भारतातील ७५ टक्के महिला टपाल कार्यालयाच्या ग्राहक आहेत. बचतीच्या माध्यमातून या महिलांची मोठी गुंतवणूक असल्याचे त्यांनी सांगितले. टपाल कार्यालयाच्या विविध योजनांची त्यांनी माहिती दिली. शोभा लोणारे, दिव्या उगले, अमरिन शेख, कुसुम डावरे, पद्मा कोकणे,

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

मनीषा मोहिते, निमगावच्या पोस्टमास्तर पूजा सोनवणे, लोणारवाडीच्या पोस्टमास्तर संजीवनी सोनवणे, देवपूरच्या पोस्टमास्तर रेश्‍मा गांधी, जया मुरकुटे, निकिता गायकवाड, अंकिता कन्नोर, मालती डावरे, भाग्यश्री संवत्सरकर, कल्पना जोशी, योगिता राठी तसेच महिला बचत प्रतिनिधींचा श्री. कपोते यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार झाला.

बाळासाहेब दराडे यांनी सूत्रसंचालन केले. ज्ञानेश्ववर घोडे यांनी आभार मानले. मनोज निरगुडे, अजय गायधनी, विश्वंभर त्रिभुवन, महेश पवार, संदीप आढाव, एकनाथ बेदाडे, जया मुरकुटे, बाळासाहेब दराडे, ज्ञानेश्ववर झगडे आदी उपस्थित होते.