Womens Day 2023 : एबीबीत गिरीश ओक यांच्या हस्ते महिला कर्मचाऱ्यांच्या आईंचा मातृगौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

womens day 2023 unique initiative by ABB to honor mothers of women officers working in its organization nashik news

Womens Day 2023 : एबीबीत गिरीश ओक यांच्या हस्ते महिला कर्मचाऱ्यांच्या आईंचा मातृगौरव

सातपूर (जि. नाशिक) : आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करताना आनेक संस्था मात्र आपली संस्कृती वेशीवर टागंत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते.

पण एबीबी (ABB) ने मात्र आजही पर्यावरणाबरोबर संस्कृती ही जपली आहे. (womens day 2023 unique initiative by ABB to honor mothers of women officers working in its organization nashik news)

त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे एबीबीने आपल्या संस्थेत काम करणाऱ्या महिला आधिकारी कर्मचारी यांच्या मातोश्रींचा गौरव करत एक अनोखा उपक्रम केल्याची भावना विख्यात अभिनेता गिरीश ओक यांनी मार्गदर्शन करतांना व्यक्त केली . यावेळी ओक यांच्या हस्ते सर्व महिला कर्मचाऱ्यांच्या आईचा गौरव करण्यात आला.

दरम्यान प्रत्येकालाच अस वाटत की आपली भावी पिढी एखाद्या संस्थेत काम करत असतांना नेमक काम काय करते त्या जागेवर अथवा कंपनीतील परीसर पाहण्याची इच्छा असते. पण तस होतांना दिसत नाही. अनेक कंपन्यांमध्ये कामगार कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाच प्रवेश दिला जात नाही.

नेमक्या याच गोष्टी हेरून एबीपी च्या नाशिक प्रकल्पातील मानव संशोधन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक यांनी महिला दिनाचे औचित्य साधून अनोखा उपक्रम राबवला आहे. एबीबीने या वर्षी आपल्या संस्थेत काम करत असलेल्या महिला वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या आईंना कंपनीत बोलावून त्यांना आपली मुलगी नेमकी कुठे काय काम करते ही जागा पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

तसेच सुमारे 40 महिला कर्मचाऱ्यांच्या आईचा मातृ गौरव सन्मान अभिनेता डॉक्टर गिरीश ओक यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच ओक यांच्याशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर कंपनीचे उपाध्यक्ष गणेश कोठावडे हे होते

गॅस स्विच केअर चे उपाध्यक्ष मिरज कुलकर्णी एडमिनचे वरिष्ठ व्यवस्थापक अमित सैनिक एचआरचे वरिष्ठ व्यवस्थापक दयानंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.यावेळी ओक यांनी महिला प्रतिभेसह संवाद साधत त्यांचा व्यवसाय प्रवास आणि अनुभव कथन केले त्यांनी थेटर मध्ये लैंगिक समानता कशी पाळली जाते हे विशद केले.

एचडी उपक्रम पाहण्यासाठी त्यांनी शॉप फ्लॉवरला भेट दिली आणि सुरक्षा स्वतःचा भाग म्हणून आयोजित केलेल्या चालता बोलता स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक गणेश कोठावडे विभाग व्यवस्थापक वितरण सोल्युशन यांनी पाहुण्यांचे स्वागत आणि कृतज्ञता चिन्ह देऊन सत्कार केला.