Womens Day 2023 : ‘सकाळ’ व ‘ॲग्रोवन’ तर्फे कर्तृत्वानं महिलांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

On the occasion of International Women's Day, women were honored by 'Sakal' and 'Agrovan' on Wednesday.

Womens Day 2023 : ‘सकाळ’ व ‘ॲग्रोवन’ तर्फे कर्तृत्वानं महिलांचा सन्मान

मालेगाव (जि. नाशिक) : ‘सकाळ’ व ‘ॲग्रोवन’ (Agrowon) तर्फे जागतिक महिला (Womens Day 2023) दिनानिमित्त बुधवारी (ता. ८) शहर व जिल्ह्यातील शेती क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्वानं महिलांचा सन्मान करण्यात आला. (womens day 2023 Women honored for their achievements by Sakal and Agrowon nashik news)

अलका उत्तम पिंगळे (मातोरी), ज्योती विजय शिंदे (आडगाव), वेदिका जयदत्त होळकर (लासलगाव), शोभा राजाराम निमसे, गिरनारे रुग्णालयाच्या डॉ. स्वाती पवार, सुनीता ज्ञानेश्वर पिंगळे यांना गौरविण्यात आले.

शेतीसाठी प्रसिद्ध होणाऱ्या ‘ॲग्रोवन’ ची वाचकांसाठी नवीन कुपन स्पर्धा शुक्रवार (ता.१०) पासून भरघोस बक्षीसांसह सुरू होत आहे. या बद्दलची माहितीही यावेळी देण्यात आली. सत्कार मूर्ती महिलांनी सत्कार स्वीकारताना म्हटले, की सकाळ माध्यम समूह व ॲग्रोवन कायमच समाजातील विविध घटकांसाठी सक्रिय सहभाग घेत आहे.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

आजच्या युगामध्ये योग्य असे मार्गदर्शन ॲग्रोवन मार्फत शेतीसाठी केली जाते. याचा लाभ असंख्य शेती व शेती संबंधित काम करणाऱ्या घटकांना मिळालेला आहे. सकाळ- ॲग्रोवनकडून झालेला गौरव हा आमच्या केलेल्या कामाची पावती होय, असे सत्कार स्वीकारताना मत व्यक्त केले.

"आपला देश कृषिप्रधान आहे. सकाळ माध्यम समूहाच्या वतीने झालेला हा सत्कार हा आम्हाला पाठबळ देणार आहे शासकीय पातळीवर कृषी क्षेत्राबाबत व शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेतले जावे ही अपेक्षा होय." - वेदिका जयदत्त होळकर, लासलगाव