Nashik News : HPT महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण विषयावर कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Doc. Sukhadev Thorat

Nashik News : HPT महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण विषयावर कार्यशाळा

नाशिक : नवीन शैक्षणिक धोरणात उच्च शिक्षणाचा सखोल विचार करण्यात यावा अन् यातून आर्थिक दुर्बल घटकांना न्याय देणारे धोरण निर्माण व्हावे असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी चेअरमन डॉ. सुखदेव थोरात यांनी गुरुवारी (ता. ९) एचपीटी आर्ट्स अँड आरवायके सायन्स महाविद्यालयात केले. (Workshop on New Education Policy at HPT College nashik news)

महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन शैक्षणिक धोरण गुणवत्ता आणि समन्याय (समदृष्टी) या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेच्या बीजभाषणात डॉ. थोरात यांनी आपले मत मांडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीवायके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी होते. यावेळी प्राचार्या डॉ. मृणालिनी देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेचे समन्वयक आणि विभाग प्रमुख डॉ. विजयकुमार वावळे यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला.

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

दीपप्रज्वलन, विद्यापीठ गीत आणि गोखले एज्युकेशन सोसायटी गीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. सूत्रसंचालन डॉ. चंद्रशेखर घुगे आणि डॉ. भारती कोल्हे यांनी केले. आभारप्रदर्शन प्रा. विश्वजित कदम यांनी केले.

पहिल्या सत्रातील चर्चेचा समारोप गोखले एज्युकेशन सोसायटीच्या स्टाफ ट्रेनिंग अ‍कॅडमीच्या समन्वयक डॉ. अंजली कुलकर्णी यांनी केला. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.प्रणव रत्नपारखी व डॉ. लोकेश शर्मा, प्रतिनिधी, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. द्वितीय सत्र अंमलबजावणी आणि आव्हाने या विषयावर झाले.