HSC Exam : परीक्षा केंद्रालगतचे झेरॉक्स केंद्र बंद! गैरप्रकार टाळण्यासाठी सहाय्यक आयुक्तांचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hsc exam

HSC Exam : परीक्षा केंद्रालगतचे झेरॉक्स केंद्र बंद! गैरप्रकार टाळण्यासाठी सहाय्यक आयुक्तांचे आदेश

नाशिक : बारावीच्या परीक्षांना मंगळवारी (ता. २१)पासून सुरवात होत असून, परीक्षा केंद्रालगतचे झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याचे आदेश आहेत.

कॉपीमुक्त परीक्षेसाठी केंद्राच्या चारही बाजूने शंभर मीटर अंतरात जमावबंदी आदेश सहाय्यक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांनी जारी केले आहेत. (Xerox center under near center closed Orders of Assistant Commissioner to prevent cheating in HSC Board exam Nashik News)

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरवात होत आहे. परीक्षा केंद्रात गैरमार्गाने कॉपी व इतर साहित्य पुरविण्याची शक्यता असते. या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सहाय्यक आयुक्तांनी २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत परीक्षा केंद्राच्या चारही बाजूने अनधिकृत व्यक्तींसह वाहनांना प्रवेश मनाई केली आहे.

यांसह परीक्षा केंद्रालगत झेरॉक्स सेंटरसह टेलिफोन, एसटीडी व आयएसडी बूथ, फॅक्स, ध्वनिक्षेपक बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच परीक्षा केंद्रात फोन, पेजर, मोबाईल, कॅल्क्युलेटर, वायरलेस सेट, अग्निशस्त्रे व घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास भादंवी कलम १८८ अंतर्गत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.