
Yoga Health Benefit: सुदृढ जीवनासाठी तरुणाईला भावतोय 'योगा से ही होगा'चा मंत्र! नियमित सरावावर भर
Yoga Health Benefit : गेल्या काही वर्षांमध्ये योगशास्त्राबाबत समाजा सजगता निर्माण होत असताना, तरुणाईदेखील या शास्त्राकडे आकर्षित होताना दिसते. धकाधकीच्या काळात सुदृढ जीवन जगण्यासाठी तरुणांकडून ‘योगा’ ला प्राधान्य दिले जाते आहे.
ऑनलाइन-ऑफलाइन अशा विविध पातळ्यांवर प्रशिक्षण घेण्याकडे ओढा वाढला आहे. साधारणतः दर महिन्याला नाशिकमध्ये सुमारे ४ ते ५ हजार युवक-युवती योगाचे धडे गिरविता आहेत व प्रशिक्षणानंतर नियमित सरावावर अनेकांचा भर असल्याची माहिती जाणकारांकडून दिली जाते आहे. (Yoga Health Benefit felt by youth for healthy life Emphasis on regular practice nashik news)
वयोगट कुठलाही असो, आजारपण कुणालाच नको असते. जखम किंवा दुखणे, शारीरीक व्याधी ह्या काही लक्षणांतून किमान निदर्शनात येतात. परंतु मानसिक व्याधी बहुधा लक्षात येत नाही. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला तणावाने ग्रासले आहे.
विशेषतः तरुणांमध्ये करिअर, नोकरी, वैवाहिक जीवन अशा विविध पातळ्यांवर तणाव निर्माण होतो आहे. परंतु आजार वाढून त्याचे गंभीर परिणाम भोगण्यापेक्षा युवा वर्गाकडून योगासनांच्या माध्यमातून तणावाचे व्यवस्थापन करण्यावर भर दिला जातो आहे.
फारसा खर्चिक नसलेला हा पर्याय सर्वांकडून सहजरित्या निवडला जातो आहे. विशेषतः कोरोना महामारीनंतर जागृकता वाढली असून, दर महिन्याला सरासरी पाच ते सहा हजार युवक-युवती नव्याने योगशास्त्राचे प्रशिक्षण घेत असल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलेला आहे.
महिन्यापासून वर्षापर्यंत प्रशिक्षण
उपलब्ध वेळेनुसार योगशास्त्राचे प्रशिक्षण घेण्यासाठी विविध पर्याय सध्या उपलब्ध आहेत. विविध योग संस्थांकडून अल्पदरात किंवा निःशुल्क स्वरूपात योगशास्त्राचे प्रशिक्षण दिले जाता आहेत.
अगदी आठवडा व सामान्य व परिपूर्ण माहितीवर आधारित एक महिन्याच्या प्रशिक्षणापासून पारंगत होण्यासाठीचे वर्षभरापर्यंतचे प्रशिक्षण वर्ग चालविले जाता आहेत. त्यात प्रवेशासाठी तरुणाईचे प्रमाण सर्वाधिक राहाते आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
यामुळे तरुणाईची ‘योगा’ ला पसंती..
* शारीरीक, मानसिक स्वास्थ चांगले ठेवण्यावर भर
* उपलब्ध वेळेनुसार योगासने करण्याची लवचिकता
* खर्च काहीच नसल्याने सर्वांना शक्य
* प्रशिक्षणामुळे मिळतेय योग्य मार्गदर्शन
* सकारात्मक परिणाम दिसू लागल्याने वाढलेय आकर्षण
* मित्र-मैत्रिणींच्या अनुभवामुळे होताय अनेक युवक प्रोत्साहित
"गेल्या काही वर्षांमध्ये योगाचे प्रशिक्षण घेण्यासाठी युवा वर्गाचा ओढा वाढला आहे. बदल्या जीवनशैलीत तणावासह अनेक व्याधींपासून बचाव करतांना युवकांकडून नियमित योगसाधना केली जाते आहे. खर्चिक विषय नसल्याने व उपलब्ध वेळेनुसार सराव करण्याची मुभा असल्याने युवकांची पसंती मिळते आहे." - चेतना शर्मा, योगशिक्षक.
न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।
तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति ॥
अर्थात या जगात दिव्यज्ञानापेक्षा शुद्ध अन्य काहीच नाहीये. जी व्यक्ती दीर्घकालीन योगच्या अभ्यासाद्वारे मनाला शुद्ध करते, अशी व्यक्ती योग्य वेळी हृदयात या ज्ञानाचे आस्वादन करत असते.