Nashik News : पालखेडला तरूण शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या | young farmer committed suicide by jumping into well in Palkhed Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

manoj jagjhap

Nashik News : पालखेडला तरूण शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Nashik News : पालखेड मिरचीचे येथील तरूण शेतकरी मनोज भगिरथ जगझाप (३७) याने आर्थिक विवंचनेतून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. (young farmer committed suicide by jumping into well in Palkhed Nashik News)

द्राक्षबागेसह व इतर पिकांच्या कोसळलेल्या भावामुळे आर्थिक देवाणघेवाण पूर्ण होऊ शकली नाही. त्यात एका बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या फेडीसाठी तगादे वाढल्याने त्यांनी हातउसने व नातेवाईंकाकडून पैसे घेऊन बँकेचे कर्ज नुकतेच भरले होते.

पुन्हा याच बँकेकडून कर्ज घेऊन ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांचे परत देऊ असे नियोजन असताना या शेतकऱ्याला बँकेने कर्ज देण्याचा नकार दिल्याने हा धक्का मनोजला सहन झाला नाही.

त्यातच ज्यांच्याकडून पैसे घेतले होते, त्यांची परतफेड कशी करायची या विवंचनेत असताना आज (ता.१६) सकाळी अकराच्या सुमारास आपला मोबाईल महत्वाची कागदपत्रे असलेले पाँकिट विहिरीतील पेटित ठेवले व पोटाला दगड बांधून विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

घरातील सदस्यांनी सगळीकडे शोधाशोध घेऊनही संपर्क होत नसल्याने शंकेचे निरसन म्हणून विहिरीलगत चपला दिसून आल्या. विहिरीतील पाण्यात शोध घेतला असता मनोजचा मृतदेह विहिरीत आढळून आला.

तो काढून पिंपळगावाच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले असता डाँक्टरांनी मृत घोषित केले. पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बोराळे तपास करत आहे.

मनोजच्या मागे आई, भाऊ, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. मनोज अतिशय हुशार व मनमिळावू स्वभावाचा असल्याने त्याच्याबद्दल संपूर्ण मित्रपरिवार, नातेवाईक व नागरिकांत हळहळ व्यक्त होत आहे.