Nashik News : हृदयविकाराच्या धक्क्याने तरुणाचे धावत्या दुचाकीवर निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death

Nashik News : हृदयविकाराच्या धक्क्याने तरुणाचे धावत्या दुचाकीवर निधन

सिन्नर (जि. नाशिक) : पोटात दुखू लागल्याने सिन्नरला दवाखान्यात तपासण्यासाठी येत असताना तीस वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना झाल्याची मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास सिन्नर -घोटी महामार्गावर घडली. (Young man dies on running bike due to heart attack Nashik News)

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

अमोल प्रकाश शिरसाठ 30, राहणार सोनांबे असे मृत तरुणाचे नाव आहे. सायंकाळी त्याच्या पोटात अचानक दुखू लागल्याने तो काका व आईला सोबत घेऊन दुचाकीवरून सिन्नरला डॉक्टरांकडे तपासायला येत होता. काका संजय शिंदे हे दुचाकी चालवत होते.

त्यांच्या मागे अमोल व पाठीमागे त्याची आई बसली होती. घोटी महामार्ग वरून सिन्नरकडे येत असताना लोणारवाडी जवळच्या बंधन लॉन्स समोर अमोल याला हृदय विकाराचा धक्का आला. त्याने दुचाकी वरच अंग टाकून दिले.

पाठीमागे बसलेल्या आईने त्याला कसेबसे सांभाळत सिन्नर पर्यंत आणले. सिन्नर शहरातील खाजगी रुग्णालयात त्याला तपासणीसाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तो दवाखान्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले. मृतदेह सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. मयत अमोल हा आईसोबत सोनांबे गावात वास्तव्याला होता. माळेगाव येथील खाजगी कंपनीत तो नोकरीला होता.