Fri, June 2, 2023

Nashik News: होळीला गालबोट, नाशिकमध्ये हत्यांचे सत्र सुरूच, मिरची व्यापाऱ्याची हत्या
Published on : 6 March 2023, 2:25 pm
Nashik : नाशिक शहरात खुनाचे सत्र सुरूच आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरातील नागरिक भितीच्या सावटाखाली आहेत. सोमवारी (ता. 6) पंचवटीत एका युवकाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. दिंडोरी नाका परिसरात ही घटना घडली आहे. किरण गुंजाळ असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मयत किरण गुंजाळ हा पेठ रोड वरील शनी मंदिर समोर वास्तव्यास होता तर मिरची विक्रीचा व्यापार करत असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत. तथापि परिसरातील अभिषेक स्वीट येथील सी सी टी व्ही तपासणी सुरू आहे.