Nashik Crime News : ATM कार्डची अदलाबदल करून तरुणीला फसविले!

Crime News
Crime Newsesakal

नाशिक : बोधलेनगर येथील एटीएम सेंटरवर पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणीला मदतीच्या बहाण्याने संशयितांनी हातचलाखी करीत एटीएम कार्ड अदलाबदल करून दिले. त्यानंतर संशयितांनी तरुणीच्या एटीएम कार्डचा वापर करून खात्यावरून १९ हजार रुपये काढून घेत आर्थिक फसवणूक केली. (Young woman cheated by changing ATM card Nashik Crime News)

याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात सात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एटीएमच्या सीसीटीव्हीतील फुटेजनुसार पोलिस संशयितांचा शोध घेत आहे. मनाली प्रमोद दोंदे (रा. जेलरोड) या तरुणीच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (ता. १०) सकाळी पैसे काढण्यासाठी बोधले नगरमधील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये गेल्या होत्या.

त्या वेळी एटीएम सेंटरच्या आजूबाजूला सात संशयितांनी तिला हेरले. संशयितांनी एटीएम सेंटरमध्ये गर्दी करून लवकर पैसे काढा, वेळ होत आहे, असे बोलून चोरुन तिचा एटीएम पीन पाहिला. त्यानंतर ‘पैसे काढून देतो, मदत करतो’, असा बहाणा करीत, मनाली यांचे एटीएम कार्ड ताब्यात घेतले.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

Crime News
Nashik Political News : आगामी निवडणुकीत भाजप- सेना युतीचा भगवा; मुख्यमंत्र्यांना दिला शब्द

त्यानंतर खोटे व तांत्रिक अडचणीचे कारण देत पैसे निघत नसल्याचे सांगून तिच्या एटीएम कार्डासारखेच दुसरे कार्ड बदलून परत केले. त्यामुळे मनाली या सेंटर बाहेर गेल्या. त्याचवेळी संशयितांनी तिच्याकडील एटीएम कार्डाचा गैरवापर करून तिच्या वडिलांच्या बँक खात्यातून एकदा 10 हजार व दुसऱ्यांदा 9 हजार असे 19 हजार रुपये परस्पर काढून घेतले.

दरम्यान, बँक खात्यातून एवढे पैसे वजा झाल्याचे मनालीच्या वडिलांना कळाले. त्यांनी तिच्याकडे विचारणा करताच, तिने घडलेला प्रकार सांगितला.

Crime News
Nashik News : गोदावरीच्या पूररेषेत बांधकामाचा मलबा; हरित लवादाची महापालिकेला नोटीस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com