गॅरेज व्यवसायाकडे तरुणांचा कल

मालेगाव : गॅरेजमध्ये काम करताना तरुण
मालेगाव : गॅरेजमध्ये काम करताना तरुणesakal

सोयगाव (जि. नाशिक) : शहरातील तरुण वाढत्या बेरोजगारीमुळे गॅरेज व्यवसायाकडे वळले आहेत. त्यामुळे शहरात लहान-मोठ्या गॅरेजची संख्या वाढत आहे. शहर व परिसरात गॅरेजची संख्या पाचशेहून अधिक आहे. मौसम चौक ते मनमाड चौफुली या रस्त्यालगतच सर्वाधिक गॅरेज आहेत. या रस्त्याला ‘गॅरेजलाइन’ असे म्हटले जाते. या व्यवसायात रोजची लाखो रुपयांची उलाढाल होते. यातून शेकडो जणांना रोजगार मिळाला आहे. पूर्व भागातील मुस्लिम तरुण प्रामुख्याने दुचाकी व चारचाकी वाहन दुरुस्तीच्या कामात आघाडीवर आहेत.

या व्यवसायात भांडवल कमी लागत असल्याने अल्पशिक्षित तरुणांचा या कामाकडे ओढा आहे. गॅरेज व्यवसायात तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. महिनाभर हे तरुण मोठ्या गॅरेजमध्ये काम शिकतात. त्यानंतर स्वतःचे छोटेसे गॅरेज टाकतात. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मदत करतात. मोठ्या गॅरेजमध्ये दोनशे ते अडीचशे रुपये रोजाने तरुण काम करतात. वर्षानंतर पाचशे रुपयांपर्यंत दिवसाला कमाई करतात.

मालेगाव : गॅरेजमध्ये काम करताना तरुण
गावखेड्यातील कलाकारांना वेबसिरीजच व्यासपीठ

मालेगाव शहरातील पूर्व भागात मोठ्या प्रमाणात गॅरेज आहेत. सुशिक्षित तरुणही आता या व्यवसायाकडे वळले आहेत. अवघ्या महिन्या-दोन महिन्यांत काम शिकून कुशल मेकॅनिक म्हणून हे तरुण व्यवसायात सराईत होत आहेत. दिवसाला तीन ते चार दुचाकींचे पूर्ण सर्वसाधारण व दोन ते तीन किरकोळ कामे केल्यास दीड ते दोन हजार रुपये या व्यवसायात मिळू शकतो. त्याशिवाय भंगार, खराब ऑइल व टाकाऊ साहित्यातून मिळणारा पैसा वेगळा. साधारणत: महिन्यातून एकदा या वस्तूंची विक्री होते. यातून येणारा पैसा स्वतंत्रपणे शिल्लक राहतो. याशिवाय दुचाकी, चारचाकी गॅरेजचालकांना स्वत:च्या गाडीची गरजही भासत नाही. प्रामुख्याने या व्यवसायात विश्‍वास महत्त्वाचा असतो. विश्‍वासावरच वाहन दुरुस्तीची कामे केली जातात.

"गेल्या नऊ वर्षांपासून मी स्वतःचे गॅरेज टाकले आहे. घरची परिस्थिती नाजूक असल्याने बारावी झाल्यावर मी या व्यवसायात आलो. आता चार ते पाच वर्षे मला या व्यवसायात झाली. माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावरच चालतो."

-विजय सौंदाणे, गॅरेज मेकॅनिक, मालेगाव

"मालेगाव शहरात पाचशेहून अधिक गॅरेज आहेत. अनेकांना या व्यवसायामुळे रोजगार मिळाला आहे. दुचाकी ते चारचाकी व मालवाहू वाहनांची गॅरेज आहेत. त्यामुळे आताच्या सुशिक्षित तरुणांचा गॅरेज व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात कल आहे."

-रशीद उस्मान गणी, गॅरेजचालक

मालेगाव : गॅरेजमध्ये काम करताना तरुण
राष्ट्रीय स्‍पर्धेत संजीवनीला सुवर्णपदक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com