esakal | नाशिक : पुराच्या पाण्यात उंचावरून उड्या मारत जीवघेणी स्टंटबाजी! गोदावरीतील थरार
sakal

बोलून बातमी शोधा

stunt

नाशिक : पुराच्या पाण्यात उंचावरून उड्या मारत स्टंटबाजी

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नाशिक : नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे (heavy rain) पूर (flood) सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नाशिक येथील रामकुंडावर नदी दुथडी भरून वाहत आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करताच रामकुंडावर पोहणाऱ्यांची गर्दी (Youth swimming in flood water at ramkund) वाढली आहे. याठिकाणी काही तरुण उंचावरून उड्या मारत जीवघेणी स्टंटबाजी ( Suicidal stunts in flood water) करत आहे. या घटनेचा लाइव्ह व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल (Viral video) होतं आहे.

स्टंटबाजीचा व्हिडीओ सोशल मिडियात वेगाने व्हायरल

गेल्या काही तासांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळत आहेत. त्यामुळे गंगापूर धरण फुल्ल भरलं आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तसेच नदीच्या काठावरील अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. असं असताना काही तरुण मात्र रामकुंडावर पोहण्यासाठी पोहोचले आहेत. ते उंच इमारतीवरून नदीत जीवघेणी स्टंटबाजी करत आहेत. प्रशासनाचे कर्मचारी याकडे कानाडोळा करताना दिसत आहे. तरुणांच्या स्टंटबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतं आहे.

हेही वाचा: गंगापूर धरणातून पाणी सोडल्यामुळे गोदावरी नदीला पूर; पाहा व्हिडिओ

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे (Cyclone Gulab) मागील दोन दिवसांपासून राज्यात अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) झोडपून काढलं आहे. त्यामुळे अनेक नद्या आणि धरणं ओसंडून वाहू लागले आहेत.

हेही वाचा: नाशिक : गंगापूर धरणातून होणार मोठ्या प्रमाणात विसर्ग

loading image
go to top