जि. प. गट, गण प्रारूप रचनेचे अंतिम राजपत्र 27 ला निघणार

ZP Nashik
ZP Nashikesakal

नाशिक : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने गट आणि गणाच्या प्रारूप रचनेवर विभागीय आयुक्तांकडून सुनावणी झाल्यानंतर बुधवारी (ता.२२) या सुचविलेल्या बदलानंतर जिल्ह्यातील गट, गण रचना प्रशासनाकडून अंतिम करण्यात आली आहे. २७ जून रोजी अंतिम रचना ही राजपत्राच्या माध्यमातून प्रसिद्ध केली जाईल. (Zilla Parishad final gazette of group, group format will be issued on 27th nashik news)

जिल्ह्यात ११ गट आणि २२ गण वाढले आहेत. यानुसार जिल्हा परिषदेत ८४ गट आणि पंचायत समितीच्या १६८ गणांची प्रारूप रचनेची अधिसूचना २ जून रोजी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार नव्याने तयार करण्यात आलेल्या गट, गण रचनेवर हरकती दाखल करण्यासाठी ८ जून पर्यंतची मुदत देण्यात आली होती. जिल्ह्यातून तब्बल ९३ हरकती जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाल्या होत्या. यामध्ये सर्वाधिक २० हरकती निफाड, सिन्नर, नाशिक या तालुक्यांमधून अधिक हरकती होती. यामध्ये काही गट, गण हे पूर्वीप्रमाणेच ठेवण्याची मागणी ही हरकतींमधून करण्यात आली होती.

ZP Nashik
Monsoon Update : पहिल्याच पावसात दहीपुलावर 4 फुटांपर्यंत पाणी

या सर्व हरकतींवर विभागीय आयुक्त यांच्या दालनात १३ जून रोजी सुनावणी घेण्यात आली. यामध्ये विभागीय आयुक्तांनी सुचविलेल्या सूचनानुसार काही गट, गणांमध्ये बदल केल्यानंतर बुधवारी (ता.२२) जिल्हा प्रशासनाकडून गट, गण प्रारूप रचना ही अंतिम करण्यात आली आहे. आता २७ जून रोजी ही अंतिम प्रारूप रचना प्रसिद्ध केली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

ZP Nashik
नाशिकला अपेक्षा हनुमान उडीची; HALमुळे विमानांचा ‘MRO’ शक्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com