जिल्हा परिषदेच्या आरोग्य भरतीसाठी ७, ८ ऑगस्टला लेखी परीक्षा

(Zilla-Parishad-Health-Recruitment-Written-exam
(Zilla-Parishad-Health-Recruitment-Written-examesakal

नाशिक : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर (corona virus) ग्रामीण जनतेला तत्काळ आरोग्यसेवा मिळण्यासाठी २०१९ मधील मेगा भरती आणि मार्च २०१९ मध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातींमधील १८ संवर्गापैकी जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाच्या पाच संवर्गासाठी सर्व रिक्त पदे भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. भरती प्रक्रियेच्या मार्गदर्शक सूचना सोमवारी (ता. १४) ग्रामविकास विभागाने दिल्या. त्यानुसार आरोग्य पर्यवेक्षक, औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका या पदांच्या भरतीसाठी ७ आणि ८ ऑगस्टला लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. (Zilla-Parishad-Health-Recruitment-Written-exam-nashik-marathi-news)

मार्च २०१९ मधील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना संधी

आरोग्य पर्यवेक्षक पदासाठी ७ ऑगस्टला सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत आणि त्याचदिवशी दुपारी तीन ते सायंकाळी पाच यावेळेत औषधनिर्माता पदांसाठी लेखी परीक्षा होईल. ८ ऑगस्टला सकाळी अकरा ते दुपारी एक यावेळेत आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका पदांसाठी, तर दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांसाठी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षेनंतर उत्तरांची ‘की’ प्रसिद्ध करणे, उमेदवारांना हरकत घेण्यासाठी तीन दिवसांचा वेळ देणे, अंतिम निकाल जाहीर करणे आणि पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व त्यानंतर नियुक्तीचे आदेश देणे यासाठी ९ ते २३ ऑगस्ट हा कालावधी निश्‍चित करण्यात आला आहे.

एकापेक्षा अधिक पदांसाठी परीक्षा शक्य

राज्यात एकाच दिवशी परीक्षा होणार असल्याने उमेदवाराला एकाच जिल्हा परिषदेच्या परीक्षेसाठी उपस्थित राहता येईल. तसेच उमेदवाराने जिल्हा परिषदमधील एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज केला असल्यास एकापेक्षा अधिक पदांसाठी परीक्षा देता येईल. त्यासाठी उमेदवाराला कोणत्या जिल्हा परिषदेची परीक्षा देणार याचा पर्याय देणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, भरती प्रक्रियेसाठी कोकण विभागीय आयुक्तालयातील आस्थापना उपायुक्तांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी सरकारकडून पदभरतीसंबंधी उमेदवारांची माहिती व परीक्षा शुल्क महाआयटीकडून प्राप्त करुन घ्यायची आहेत. नोडल अधिकाऱ्यांनी सरकारने नियुक्त केलेल्या ओएमआर व्हेन्डर न्यास कम्युनिकेशन यांच्यासोबत करारनामा करणे. २०१९ मधील मेगाभरतीतील उमेदवारांची माहिती व्हेन्डरला देणे. जिल्हा निवड समितीने आरोग्य विभागाशी संबंधित १०० टक्के रिक्तपदे भरण्यासाठी दिव्यांगासाठी चार टक्के आरक्षण तपासून निश्‍चित करण्यासाठी १५ ते २८ जून हा कालावधी निश्‍चित करण्यात आला आहे.

दिव्यांगांच्या समावेशासाठी जाहिरात

दिव्यांगासाठी तीनऐवजी चार टक्के समावेश केल्याने त्यासाठी जाहिरात २९ व ३० जूनला प्रसिद्ध करायची आहे. नव्याने समाविष्ट दिव्यांग उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवणे, पात्र उमेदवारांकडून जिल्ह्याचा विकल्प घेणे, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या उमेदवारांकडून विकल्प घेणे, एसईबीसी उमेदवारांकडून प्राप्त विकल्पानुसार खुल्या प्रवर्गाचा विकल्प दिल्या जाणाऱ्यांकडून परीक्षा शुल्क आकारणे, त्यांच्याकडून ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणे, यापूर्वी खुल्या प्रवर्गातून अथवा इतर प्रवर्गातून अर्ज केलेल्या आणि नव्याने समाविष्ट झालेल्या दिव्यांग उमेदवारांकडून विकल्प घेणे ही प्रक्रिया १ ते २१ जुलै या कालावधीत होणार आहे. दिव्यांगांना नवीन प्रवर्गासाठी अर्ज कऱण्याची अंतिम मुदत २१ जुलै राहील. जिल्हा निवड समितीने व्हेन्डरमार्फत पात्र उमेदवारांचे परीक्षा प्रवेशपत्र तयार करून उमेदवारांना डाउनलोड करण्यासाठी १ ते ५ ऑगस्ट हा कालावधी निश्‍चित करण्यात आला आहे.

(Zilla-Parishad-Health-Recruitment-Written-exam
भाजपचे नेते राऊत यांच्या मुक्कामी; नाशिकमध्ये चर्चेला उधाण

निवड समितीचे जिल्हाधिकारी अध्यक्ष

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधित पदे भरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी, जिल्हा सैनिक कल्याणधिकारी यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. जिल्हा आरोग्याधिकारी या समितीचे सचिव म्हणून काम पाहतील.

(Zilla-Parishad-Health-Recruitment-Written-exam
बर्थडे सेलिब्रेशन पडले महागात; मनसे कार्यकर्त्यावर गुन्हा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com