District Health Center : जि. प. आरोग्याच्या 4 कोटीतून जिल्ह्यात आरोग्य केंद्र दुरुस्तीचा घाट!

money
moneyesakal

District Health Center : जिल्हा परिषदेत गत वर्षाच्या खर्चाचा ताळमेळ लागण्याआधीच दुसरीकडे आरोग्य विभागाला पुनर्विनियोजनातून मिळालेल्या निधी नियोजन करून प्रशासकीय मान्यता देण्याची लगीनघाई सुरू आहे.

यापूर्वी दोनवेळा प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीची कामे चुकीच्या पद्धतीने केल्यानंतर पुन्हा यंदाही पुनर्विनियोजनातून मिळालेल्या ४.७ कोटी रुपयांच्या निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीचा घाट आरोग्य विभागाने घातला जात आहे.

यात बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांच्या दाखल्याशिवाय या दुरुस्तीच्या कामांचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे ही कामे वादात सापडण्याची शक्यता आहे. (zp 4 crores of health to repair district health center nashik news)

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला २०२२-२३ या आर्थिक वर्षात मार्च अखेरीस पुनर्विनियोजनातून जिल्हा नियोजन समितीकडून ४.७ कोटी रुपये निधी मिळाला आहे. एरवी कामनिहाय निधी देण्याचा आग्रह धरणाऱ्या जिल्हा नियोजन समितीने आरोग्य विभागाच्या खात्यात थेट निधी वर्ग केला आहे.

मधल्या काळात जिल्हा कोशागार विभागाने कोणत्याच विभागाला धनादेश दिले नसल्याने हा निधी अडकला होता. मात्र, गत आठवड्यातच हा निधी वर्ग झाला असून निधी वर्ग होताच आरोग्य विभागाने या निधीचे नियोजन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

अद्याप जिल्हा परिषदेच्या विभागांनी गत आर्थिक वर्षातील निधी खर्चाचा ताळमेळ करून त्याला मंजुरी घेतली नाही. आरोग्य विभागाचाही ताळमेळ लागला नसताना त्यांना या पुनर्विनियोजनातील निधीचे नियोजन सुरू केले आहे.

त्यात त्यांनी या निधीतून ६७ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्ती प्रस्तावित केल्या आहेत. कोणत्याही आरोग्य केंद्राची दुरुस्ती करायची असल्यास त्यासाठी किती निधी लागणार याबाबत संबंधित तालुक्यातील उपअभियंता यांचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

money
Water Crisis: मॉन्सूनच्या विलंबामुळे टंचाईच्या झळा बळावल्या; राज्यात 66 गावे अन 119 वाड्यांसाठी 31 टँकरची वाढ!

मात्र, आरोग्य विभागाने बांधकाम विभागाला न विचारताच स्वतःच दुरुस्तीसाठी किती निधी लागणार, हे निश्चित केले आहे. यामुळे आरोग्य विभागाच्या हेतूविषयी शंका निर्माण झाली आहे. कोणत्याही निधीतून कामांची निवड विषय समितीवर करावी लागते.

सध्या प्रशासक राजवट असल्यामुळे विषय समितीचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे आहेत. या दुरुस्तीच्या कामांची निवड करताना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परवानगी घेण्यात आली नसल्याचे समजते.

यामुळे आरोग्य विभागाची ताळमेळ करण्याआधीच निधी खर्च करण्याची आरोग्य विभागाची सुरू असलेली घाई नेमकी कशासाठी याची चर्चा आहे.

"पुनर्विनियोजनातून आरोग्य विभागास ४.७ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीचे नियोजन हे विषय समितीवर ठेवले जाणार असून त्या नियोजनाला मंजुरी घेतली जाणार आहे."

- डॉ. हर्षल नेहते, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प.

money
YCMOU News : नवीन शैक्षणिक धोरणात मुक्‍त विद्यापीठाला संधी : रमेश बैस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com