Nashik News : संगणक खरेदी अनियमितता प्रकरणी दोषींवर कारवाई : ZP CEO मित्तल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ZP CEO Ashima Mittal, Nashik News

Nashik News : संगणक खरेदी अनियमितता प्रकरणी दोषींवर कारवाई : ZP CEO मित्तल

नाशिक : जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून एक कोटी १४ लाख रुपयांच्या संगणक खरेदी प्रक्रियेत लेखा व वित्त विभागाच्या तांत्रिक तपासणीत अनियमितता झाल्याचे उघडकीस आले.

संगणक खरेदी करताना दर दहा टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी संगणक खरेदीचे फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

ही फेरनिविदा काढताना आधीच्या निविदांमध्ये दिलेले संगणकांचे स्पेसिफिकेशन बदलणे, तसेच चुकीच्या पद्धतीने निविदा राबवल्याप्रकरणी संबंधितांवर जबाबदारी निश्‍चित करण्याबाबतचे संकेत मित्तल यांनी दिले आहेत. (ZP CEO ashima Mittal Action against culprits in computer purchase irregularities Nashik News)

जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने ऑक्टोबर २०२२ मध्ये १.१४ कोटी रुपयांच्या सेसनिधीतून संगणक खरेदी प्रक्रिया पार पाडली. यात अनेक अनियमतता झाली असून, यात जिल्हा परिषदेचे १२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तसेच खरेदीतील त्रुटी निर्दशनास आणून दिल्या होत्या.

त्यामुळे ही प्रक्रीया वादात सापडली होती. खरेदीसाठी सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन न केल्याचेही नमूद केले असल्याने सामान्य प्रशासन विभागाने घाईघाईने ती फाइल मुख्य लेखा व वित्त विभागाकडे पाठवली.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या संगणक खरेदी प्रक्रियेची तांत्रिक तपासणी करण्याचे आदेश मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार लेखा व वित्त विभागाने सामान्य प्रशासन विभागाकडून या संगणक खरेदी प्रक्रियेतील सर्व सहभागी संस्थांनी जीईएम पोर्टलवर जोडलेले कागदपत्र मागवित चौकशी केली.

यात वित्त विभागाने ही निविदा रद्द करण्याची शिफारस केली. त्यानुसार मित्तल यांनी संगणक खरेदीचे फेरनिविदा काढली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान फेरनिविदा करताना संगणकाचे स्पेसिफिकेशन तेच राहिल्यास पुन्हा मागील निविदेप्रमाणे तेच पुरवठादार पात्र ठरण्याचा धोका असल्याने संगणकाचे स्पेसिफिकेशन बदलण्याचे सूचित केले आहे.

टॅग्स :NashikZPComputers