Nashik: कनिष्ठ, सहाय्यक अधिकाऱ्यांची ZP CEOनी घेतली परिक्षा; कामात बदल करून चांगले काम करण्याचे सूचना | ZP CEO Conducts Exam for Junior Assistant Officers Suggestions for better work by modifying work Nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ZP CEO Ashima Mittal, Nashik News

Nashik: कनिष्ठ, सहाय्यक अधिकाऱ्यांची ZP CEOनी घेतली परिक्षा; कामात बदल करून चांगले काम करण्याचे सूचना

Nashik : जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासह तालुकानिहाय पंचायत समित्यांमधील कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सहाय्यक प्रशासन अधिकारी यांच्या घेतलेल्या आढावा बैठकीत, मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी अधिकाऱ्यांची परिक्षा घेतली. कामकाजाबाबत १२ प्रश्नांची पत्रिका देत ही परिक्षा घेण्यात आली.

तालुकानिहाय झालेल्या बैठकीत कामकाज योग्य नसल्याचे मित्तल यांनी सांगत, कामात सुधारणा करून चांगले आदर्श काम करण्याच्या सूचना अधिकारी वर्गास यावेळी दिल्या. (ZP CEO Conducts Exam for Junior Assistant Officers Suggestions for better work by modifying work Nashik news)

मुख्यकार्यकारी अधिकारी मित्तल यांनी गत दोन महिन्यात कळवण, दिंडोरी, सुरगाणा, इगतपुरी, सिन्नर यासह मालेगाव तालुक्यातील पंचायत समित्यांमध्ये बैठक घेत आढावा घेतला. यात प्रामुख्याने पंचायत समित्यांमधील कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सहाय्यक प्रशासन अधिकारी यांचे कामकाज असमाधानकारक आढळून आले.

त्यावर, मित्तल यांनी मंगळवारी (ता.९) मुख्यालयातील तसेच प्रत्येक पंचायत समितीमधील कनिष्ठ व सहाय्यक प्रशासन अधिकारी यांच्या एकत्रित आढावा बैठक घेतली. यावेळी प्रशासनाने सर्व अधिकारी यांना त्यांच्या कामकाजाबाबत १२ प्रश्नपत्रिका दिली.

ही प्रश्नपत्रिका अधिकाऱ्यांकडून सोडवून घेतली. त्यानंतर, मित्तल यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. कनिष्ठ व सहाय्यक प्रशासन अधिकारी हा पंचायत समितीच्या पाठीचा कणा आहे. हा कणा ताठ असायला पाहिजे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

मात्र, अनेक ठिकाणी या अधिकाऱ्यांच्या कर्मचारी वर्गावर वचक नसल्याचे दिसून आले आहे. नियमित कामकाजामध्ये संबंधित अधिकाऱ्यांच्या अनेक त्रुटी असल्याचे त्यांनी निर्दशनास आणून दिल्या. यासाठी या अधिकाऱ्यांनी कामात सुधारणा करावी, अशा सूचना मित्तल यांनी यावेळी केल्या.

बैठकीत न्यायालयीन प्रकरणे, प्रलंबित लोक आयुक्त प्रकरणे, विभागीय चौकशीची प्रलंबित प्रकरणे, प्रलंबित सेवा निवृत्ती प्रकरणे, अनधिकृत गैरहजर प्रलंबित प्रकरणे, विभागीय आयुक्त कार्यालयाकडील प्रलंबित परिच्छेद, वर्ग ३ व ४ ची सरळ सेवा पदोन्नतीमधील रिक्त पदे, निलंबित कर्मचाऱ्यांची प्रकरणे,

गोपनीय अहवाल प्रतिवेदन व पुनर्विलोकन करणे तसेच अहवालाच्या प्रती कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देणे, अंतिम सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणे, आश्वासित प्रगती योजनेचे लाभ देणे, मुख्यमंत्री सचिवालय कक्षात प्राप्त तक्रार अर्जावर कार्यवाही करणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा करत, याबाबत मित्तल यांनी विविध सूचना केल्या.

टॅग्स :NashikOfficerZP