
ZP Employees Transfer : जिल्हा परिषदेत ग्रामसेवकांसह 54 जणांच्या विनंती बदल्या!
ZP Employees Transfer : जिल्हा परिषदेतील सुरु झालेल्या कर्मचारी बदली प्रक्रियेत गुरुवारी (ता.२५) ग्रामपंचापयत विभागातील विविध संवर्गाच्या बदलीत प्रशासकीय बदल्या न होता विनंती बदल्या झाल्या.
ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांच्या विनंती बदल्यांमध्ये ५९ बदल्या होणे अपेक्षित असताना ५४ बदल्या झाल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली. (ZP Employees Transfer Request for transfer of 54 people including Gram Sevaks in Zilla Parishad nashik news)
मविप्रच्या होरायझन अकॅडमी येथे, सकाळी 10 ते 4 या वेळात ग्रामपंचायत विभागातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (ग्रा.पं.) या तीन संवर्गातील बदली प्रक्रिया मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत झाली.
जिल्ह्यात एकूण ९३४ ग्रामसेवक कार्यरत असून आदिवासी क्षेत्रातील २४ पैकी २० तर बिगर आदिवासीतील २३ विनंती बदल्या झाल्या. ग्रामविकास अधिकारी संवर्गात एकूण ९ बदल्या करण्यात येणार आहेत.
यामध्ये आदिवासीतील तीन तर बिगर आदिवासीतील ६ बदल्या झाल्या आहेत. विस्तार अधिकारी संवर्गात केवळ ३ बदल्या करण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता.२६) आरोग्य, महिला व बालकल्याण विभागातील कर्मचारी बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
टेबलाखालून विनंती बदल्या ?
नियमित बदली प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे आरोग्य विभागातंर्गत विनंती बदल्यां सरार्सपणे सुरू असल्याचे दिसत आहे. विनंती बदली प्रक्रिया होत असताना काही अधिका-यांकडून आरोग्यसेवक, सेविकांच्या विनंती बदल्या केल्या जात असून त्यांना बदली आदेश देखील दिले जात आहे.
आर्थिक देवाण-घेवाण करून या विनंती बदल्या केल्या जात असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे. यामागे नेमके कोण आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.