Sakal Impact : खरशेतला नदीवर ZPने बसवला लोखंडी पूल

sakal impact
sakal impactesakal

नाशिक : खरशेत (तालुका त्र्यंबकेश्वर) येथील आदिवासी (Tribal) महिलांना 30 फूट खोल तास नदीवरील बल्ल्यांवरून रोज पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत असे. या प्रश्नाला 'सकाळ' ने वाचा फोडली. 'सकाळ'च्या सोशल मीडीयावरही (Social media) याचा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला होता. यातूनच जिल्हा परिषदेने आता बल्ल्यांच्या जागी लोखंडी पूल बसवला आहे.

30 फूट लांब आणि 4 फूट रूंद या आकाराचा पूल असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली. रस्ता आणि पाणी योजना आराखडे तयार करण्याच्या सूचना यंत्रणांना देण्यात आली आहे. आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आदिवासी कुटुंबाच्या पाणी प्रश्नांकडे लक्ष देण्याची सूचना आमदार आणि अधिकाऱ्यांना केली. दरम्यान, पाण्यासाठीचा जीवघेण्या प्रवासाचा 'सकाळ' मधील फोटो सोशल मीडीयातून व्हायरल झाला होता.

https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/tribals-struggle-every-day-for-drinking-water-trimbakeshwar-nashik-ppj97
sakal impact
2022 मध्ये येणाऱ्या Top 10 इलेक्ट्रिक बाइक्स आणि स्कूटर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com