अन्‌ नाशिककरांची सावली झाली गायब

केशव मते
रविवार, 20 मे 2018

नाशिक : सुर्य अगदी डोक्‍यावर आल्याने आज (ता.20) नाशिककरांनी शून्य सावलीचा रंजक अनुभव घेतला. सव्वा बाराच्या सुमारास सावली अगदी पायाखाली पडत असल्याने जणू सावली गायब झाल्यासारखे वाटत होते. हा अनोखा अनुभव कॅमेऱ्यात कैद करण्याचा हौशी नाशिककरांनी प्रयत्न देखील केला. खगोल प्रेमींनी मोकळी मैदाने गाठत तेथे शून्य सावली दिनाची अनुभूती घेतली. 

कधी नव्हे ते यंदा जाणवत असलेल्या तप्त उन्हाळ्याने नाशिककरांना हैराण करून सोडले आहे. दिवसाच्या वेळी उन्हात बाहेर पडणे, बहुतांश जण टाळता आहेत. परंतु आज नाशिकमध्ये शून्य सावली दिन असल्याने नाशिककरांनी उन्हाचे चटके सहन करतांना आपली सावली गायब कशी होते, याची अनुभूती घेतली. पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडेच्या भागात तर कर्क वृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्‍यावर येत नाही. तो सदैव क्रमशः उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो. पण या दोन टोकांच्या वृत्तामधील लोकांना वर्षातून दोनदा सूर्य अगदी डोक्‍यावर आलेला अनुभवयाला मिळतो. जेव्हा सूर्य बरोबर डोक्‍यावर असतो, तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू काही ती गायब होते. भौगोलिक स्थितीनुसार आज नाशिक क्षेत्रात सूर्य बरोबर डोक्‍यावर आल्याने सावली गायब झाल्याचा अनुभव नाशिककरांना घेता आल्याचे जाणकारांनी सांगितले. 
 
Web Title: Nashikar's shadow disappeared