सदृढ आरोग्याचा संदेश देत धावले नाशिककर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

नाशिक पोलीस 21 के मॅरेथॉन :

संजीवनी जाधव, रणजित पटेल, किसन तडवी, पूनम सोनवणे विजयी
 

नाशिक : शांतता आणि शहराच्या सदृढ आरोग्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित "नाशिक पोलीस 21 के मॅरेथॉन : रन फॉस पीस'मध्ये सुमारे अकरा हजार नाशिककर धावले. स्पर्धेच्या मुख्य 21 किमी अंतराच्या पुरुष गटात भोसला महाविद्यालयाचा धावपटू रणजित पटेल तर महिलांच्या गटात याच महाविद्यालयाची संजीवनी जाधव हिने बाजी मारली तर 10 किमी अंतराच्या गटात आंतरराष्ट्रीय धावपटू किसन तडवी तर महिलांमध्ये पूनम सोनवणे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

दरम्यान, पुढच्या वर्षांपासून 42 किमी अंतराची पूर्ण मॅरेथॉन आयोजित करण्याचा संकल्प नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे समारोपप्रसंगी करण्यात आले. तर आजच्या मॅरेथॉनचे मुख्य आकर्षण ठरला तो हरियाणा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू संग्राम सिंग व सिनेअभिनेत्री सायली भगत.

नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे गेल्यावर्षापासून शहराची शांतता व सदृढ आरोग्याचा संदेश देण्यासाठी 21 के मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. आज सकाळी गुलाबी थंडीच्या कडाक्‍यातही भल्या पहाटे हजारो नाशिककर गोल्फ मैदानावर हजर झाले होते. 6.30 वाजता 21 किमी अंतराच्या स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वी आलेल्या नाशिककरांनी गोल्फ क्‍लब मैदानावरील हिरवळीवर झुंबा डान्स केला. त्यानंतर पुरुष व महिलांच्या 21 किमी अंतराच्या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू संग्राम सिंग याने झेंडा दाखविला. त्यानंतर 6.50 वाजता 10 किमीच्या महिला व पुरुष गटाला सिनेअभिनेत्री सायली भगत हिच्या हस्ते झेंडा दाखविण्यात आले. 7.15 वाजता 5 किमी अंतराच्या महिला व पुरुष गटाला आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिने झेंडा दाखविला. मैदानावर झुंबा डान्स, जेलरोडच्या जल्लोष ढोल पथकाकडून मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले जात होते. तर तरणतलाव येथे स्पर्धेकांना प्रोत्साहन देण्यासाठी पंजाबी भांगडा नृत्य केले जात होते. या नृत्याचा आनंद धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आलेलेही घेत होते.
पुरुष गटाच्या 10 किमी अंतराच्या स्पर्धेतील पहिला धावपटू किसन तडवी याने 32.31 मिनिटात पूर्ण करीत

Web Title: nashikkars run for peace