साहेब..आम्हालाही पदांसाठी उमेदवारी द्या! अन्यथा आत्ताच निघू.... 

girish mahajan 3.jpg
girish mahajan 3.jpg

नाशिक : भाजपकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार ठरवत असताना नगरसेवकांनी गोवा येथील बैठकीत ज्यांना आतापर्यंत कुठलीच पदे मिळाली नाहीत त्यांना महापौर, उपमहापौरपदासाठी उमेदवारी द्यावी अन्यथा आम्ही मतदानाला येणार नाही, असा इशारा दिल्यानंतर दिग्गज नेत्यांना साइड ट्रॅक करून उमेदवारी निश्‍चित करण्यात आली आहे. महापालिकेत सत्ता स्थापन करत असताना नगरसेवक शिवसेनेच्या गोटात दाखल झाल्याने भाजपमध्ये खळबळ उडाल्याने विस्कटलेली घडी बसविण्याचा प्रयत्न होत आहे. महापौर व उपमहापौरपदाचा उमेदवार निश्‍चित करताना नगरसेवकांनी महत्त्वाची भूमिका मांडल्याने गिरीश महाजन यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या.

डावललेल्या नगरसेवकांचा गिरीश महाजन यांना बहिष्काराचा इशारा 

नाशिक महापौरपद खुल्या गटासाठी आरक्षित झाल्यानंतर इच्छुकांची भाऊगर्दी झाली. त्यात माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांचे नाव आघाडीवर होते. महापौरपदाच्या अटीवरच पाटील यांनी पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून माघारी घेतल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे पाटील यांनी महापौरपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली. स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, माजी सभापती हिमगौरी आहेर- आडके, सभागृहनेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, माजी गटनेते संभाजी मोरुस्कर, सतीश कुलकर्णी, अरुण पवार, दिनकर आढाव, भिकूबाई बागूल, कमलेश बोडके हेदेखील महापौरपदाच्या शर्यतीत होते. परंतु गोवा मुक्कामी असलेल्या नगरसेवकांनी गिरीश महाजन यांच्या वन टू वन बैठकीत महापौर, उपमहापौरपदाचा चेहरा निश्‍चित करताना आतापर्यंत ज्यांना कुठलीच पदे मिळाली नाहीत त्यांनाच पदे द्यावीत, अशी जोरदार मागणी केली. 

गोव्याच्या कॅम्पमधून आत्ताच निघू व मतदानालाही येणार नाही
पुन्हा त्याच-त्याच लोकांना महापौरपदाची उमेदवारी दिल्यास गोव्याच्या कॅम्पमधून आत्ताच निघू व मतदानालाही येणार नाही, असा थेट इशारा नगरसेवकांनी दिला. त्यातून महापौरपदासाठी दिनकर आढाव, सतीश कुलकर्णी, शशिकांत जाधव यांचे, तर उपमहापौरपदासाठी अलका अहिरे, भिकूबाई बागूल, अरुण आहेर, गणेश गिते यांचे अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्या.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com