"नॅनो टेक्‍नॉलॉजी'वर आज पटेल फार्मसीत राष्ट्रीय परिषद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

नॅनो टेक्‍नॉलॉजीसंबंधित नवनवीन डोसेज फॉर्म, सूक्ष्म तंत्रज्ञानातील आव्हाने व त्याचे उपयोग, बदलते तंत्रज्ञान व त्यामुळे निर्माण होणाऱ्या संधी या विषयी परिषदेत मार्गदर्शन होईल

शिरपूर - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व येथील आर. सी. पटेल औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातर्फे उद्या (ता. 11) सकाळी अकराला नॅनो टेक्‍नॉलॉजीची औषधनिर्माणशास्त्रातील उपयुक्तता या विषयावर राष्ट्रीय परिषद होत आहे.

माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील अध्यक्षस्थानी असतील. अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. ए. पाटील प्रमुख वक्ते असतील. पुणे येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या प्राध्यापिका डॉ. स्वाती जगदाळे, राजश्री शाहू कॉलेज ऑफ फार्मसीचे फार्मासुटिक्‍स विभागाचे प्रमुख डॉ. अविनाश टेकाडे, मुंबई येथील एनएमआयएमएसच्या स्कूल ऑफ फार्मसीचे प्रा. डॉ. अनिल पेठे नॅनो टेक्‍नॉलॉजी विषयावर मार्गदर्शन करतील. "उमवि'तील बीसीयूडीचे संचालक डॉ. पी. पी. माहुलीकर उपस्थित असतील. नॅनो टेक्‍नॉलॉजीसंबंधित नवनवीन डोसेज फॉर्म, सूक्ष्म तंत्रज्ञानातील आव्हाने व त्याचे उपयोग, बदलते तंत्रज्ञान व त्यामुळे निर्माण होणाऱ्या संधी या विषयी परिषदेत मार्गदर्शन होईल. देशभरातील तीनशेहून अधिक विद्यार्थी, पीएचडी स्कॉलर, संशोधक आदींनी नोंदणी केली असून, अधिकाधिक विद्यार्थ्यांनी परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. संजय सुराणा यांनी केले.

Web Title: national conference on nano technology