कामगार हक्क टिकविण्यासाठी एक व्हा! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

नाशिक - मोठ्या लढ्यातून मिळविलेले कामगारांचे न्याय्य हक्‍कही हिरावले जात आहेत. नव्याने नोकऱ्या निर्माण होत नाहीत. हक्‍क टिकवून ठेवण्याचेच मोठे आव्हान सध्या कामगार संघटनांसमोर उभे ठाकले आहे. त्यासाठी सर्व संघटनांनी एका झेंड्याखाली येऊन लढा देणे काळाजी गरज आहे, असे प्रतिपादन न्यू ट्रेड युनियन इनिशिएटिव्ह (एनटीयूआय) चे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. एन. वासुदेवन यांना रविवारी येथे केले. 

"एनटीयूआय'चे चौथे राष्ट्रीय अधिवेशन रविवारपासून येथे सुरू झाले. त्या वेळी उद्‌घाटनप्रसंगी कॉ. वासुदेवन बोलत होते. 3 तारखेपर्यंत हे अधिवेशन चालेल. 

कॉ. वासुदेवन म्हणाले, देशातील वाढती बेरोजगारी, कॉंग्रेसबद्दल असंतोष याचा फायदा घेऊन भाजपने सत्ता हस्तगत केली. मात्र, सत्तेवर आल्यानंतर काम कमी आणि घोषणाच जास्त करत आहे. एक कोटी नव्या नोकऱ्यांचे आश्‍वासन हवेत विरले आहे. जनसामान्यांच्या कल्याणकारी योजनांनाही कात्री लावली जात आहे. कराचा बोजा श्रीमंतांवर लादण्याऐवजी गरिबांनाच लक्ष्य केले जात आहे. पब्लिक- प्रायव्हेट पार्टनरशिपसुद्धा कंपन्यांच्या फायद्यासाठी आहे. वाढत्या बेरोजगारीमुळे सध्या या सरकारविरोधात असंतोष वाढत आहे. नव्याने नोकऱ्या निर्माण करण्यात सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे. पूर्वी वर्षाला पाच लाख नोकऱ्या नव्याने निर्माण होत. आता फक्त एक लाख नोकऱ्यांवर समाधान मानावे लागत आहे, म्हणूनच सर्व कामगार संघटनांनी पुन्हा एकत्र येणे गरजेचे झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: National Conference of NTUI worker