'परिषदेमुळे खूप शिकायला मिळाले'; राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेत उपस्थितांच्या प्रतिक्रिया

"परिषदेमुळे खूप शिकायला मिळाले'; राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेत उपस्थितांच्या प्रतिक्रिया
"परिषदेमुळे खूप शिकायला मिळाले'; राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेत उपस्थितांच्या प्रतिक्रिया

"सकाळ-ऍग्रोवन' आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या दोनदिवसीय राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेत राज्यभरातील शेतकरी, कृषीविषयक शिक्षण घेणारे विद्यार्थी, शास्त्रज्ञ, मान्यवर तसेच गृहिणीही उपस्थित आहेत. परिषमुळे खूप काही नवीन शिकायला मिळाल्याच्या प्रतिक्रिया उपस्थित व्यक्त करत असून अशा परिषदा सातत्याने आयोजित कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेत. त्यापैकी काही निवडक प्रतिक्रिया -

"सकाळ'च्या राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेमुळे आम्हाला वाईन निर्मिती प्रक्रिया बघण्याची संधी मिळाली. आजकाल सगळीकडे आधुनिकता आलेली आहे. सुला विनियार्डे हे शेतमालावर प्रक्रिया करण्याचे उत्तम व पथदर्शी उदाहरण आहे. भविष्यात इतर देशांसारखे भारतातील शेतकऱ्यांनीही फळांपासुन वाईन निर्मितीसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा. शासन स्तरावरुन त्याचे योग्य मार्गदर्शन केले गेल्यास निश्‍चित यश येईल. शेतकरी आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात फळ पिकवतात. मात्र विक्री व जागतिक बाजारपेठेची नीट कल्पना नसल्यामुळे उच्चप्रतीचा माल देखील नाममात्र किंमतीस विकावा लागतो. अशा कृषी प्रक्रिया उद्योगांना भेटी दिल्यामुळे आपल्या मालाचा उपयोग समजतो व त्यांच्या माध्यमातुन आर्थिेक उन्नती साध्यन्याची माहिती होते.
- श्रीधर शंकरराव ठाकरे, नागपुर

"सकाळ'च्या फलोत्पादन परिषदेच्या माध्यमातून सुला विनियार्ड सारख्या निर्यातीत अग्रेसर असणाऱ्या कंपनीला भेट दिल्यामुळे सर्वसाधारण शेतकऱ्यांना देखील निर्यात व जागतिक बाजारपेठेची माहिती मिळाली. पारंपारिक शेती न करता प्रयोगशिल शेती करण्याची प्रेरणा मिळते.आज आपण काय पिकवतो त्यापेक्षा बाजारात काय विकल जाते याला जास्त महत्व असल्याने शेतकऱ्यांना देखिल बदलत्या काळाबरोबर अपडेट व्हावे लागत आहे. सकाळ माध्यम समुहामुळे प्रत्यक्ष वाईन निर्मिेती कशी होते हे अनुभवण्याची संधी मिळाली. त्याचे मनस्वी समाधान वाटते. शिवाय आमच्या ज्ञानात भर पडते. शेतीकडे पारंपारीक व्यवसाय म्हणुन बघण्याचा दृष्टिकोन बदलतो.
- भगवानराव रामकृष्ण पाटील, मु.पो.सिंघत, ता.रावेर, जि.जळगाव.

सकाळ माध्यम समुहाच्या पुढाकारातुन सर्वसामान्य शेतकऱ्यांना वाईन निर्मिती कशी होते यासाठी अभ्यास दौरा आयोजित केल्यामुळे शेतकऱ्यांना प्रयोगशिलतेची माहिती मिळाली. आपण पिकवत असलेल्या मालापासुन योग्य प्रक्रिया करुन काहीही वाया न घालवता झिरो बजेटमध्ये आर्थिक भरभराट साधता येते, असा आत्मविश्‍वास निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्याचे नैराश्‍य जावुन काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा मिळाली. म्हणून अशा परिषदांचे दरवर्षी आयोजन केल्यास शेतीकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होईल.
- नाना शेळके, मुख्य व्यवस्थापक सुला विनियार्डे.

फलोत्पादन महापरिषदेला आम्ही भेट दिल्यावर प्रयोगशील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकविलेला उत्कृष्ट शेतमाल, फळे बघावयास मिळाली. त्यातुन सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते, हे समजले. येथे आल्यावर खूप चांगली माहिती मिळाली. त्याचा आम्हा गृहिणींना देखील फायदा होवू शकेल. हा उपक्रम खूप स्तुत्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रबोधन होउन त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण होण्यास मदत होईल.
- डॉ.अनिता कुलकर्णी, नाशिक

शेतकऱ्यांनी शेतमालाच्या भावाबद्दल जागरुक राहतानाच आपल्या उत्पादनाच्या दर्जाबद्दलही सतत जागरुक राहून त्यामध्ये अद्ययावत राहायला हवे. शेती करण्याच्या पद्धतीत विविधता आणून प्रयोगशील बनले पाहिजे.

- रोहित महाजन, विद्यार्थी, बी.एस्सी. अॅग्री

शेती ते प्रयोगशाळा हे अंतर कमी होण्यासाठी धोरणात्मक पातळीवर बदल होणे आवश्यक आहे. जेणेकरून वाहतुकीवरील खर्च कमी होईल. तसेच, साठवणुकीच्या व्यवस्था आधुनिक पद्धतीने व्हाव्यात. शेतीसाठी वीज रास्त दरात उपलब्ध व्हावी.

- संकिता माधव पगार, (विद्यार्थी, बी.एस्सी. अॅग्री)

(संकलन: जयेश सुर्यवंशी, संग्राम जगताप)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com