जवान चंदूच्या कुटुंबीयांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आनंदोत्सव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

धुळे - बोरविहीर (ता. धुळे) येथील जवान चंदू चव्हाणची पाकिस्तानच्या ताब्यातून  सुटका झाल्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चंदूच्या कुटुंबीयांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. 

धुळे - बोरविहीर (ता. धुळे) येथील जवान चंदू चव्हाणची पाकिस्तानच्या ताब्यातून  सुटका झाल्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चंदूच्या कुटुंबीयांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. 

चुकून सीमारेषा ओलांडल्याने पाकिस्तानच्या ताब्यात गेलेल्या जवान चंदू चव्हाणची दोन दिवसांपूर्वी सुखरूप सुटका झाली. यामुळे देशभरात आनंदोत्सव साजरा झाला. बोरविहीर येथे तर दिवाळीच साजरी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, महानगराध्यक्ष मनोज मोरे, माजी नगरसेवक संजय वाल्हे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी बोरविहीर येथे जात चंदूचे आजोबा चिंधा पाटील, भाऊ भूषण चव्हाण यांच्यासह त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भूषण चव्हाण यांनी चंदूला भारतात आणण्यासाठी कसे प्रयत्न केले, कोणा-कोणाशी चर्चा केली, भेट घेतली, याबाबत माहिती दिली. चंदू पाकिस्तानच्या ताब्यात गेल्यानंतर माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, महानगराध्यक्ष मनोज मोरे यांनी भेट देत परिवाराला धीर दिल्याबद्दलही आभार मानले.

Web Title: Nationalist Congress celebration with young family of Chandu