महामार्गावर खड्डे बुजण्याची अजब तऱ्हा

national highway murum ernadol
national highway murum ernadol

एरंडोल ः राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेक निरपराध व्‍यक्‍तींचे बळी गेल्‍यानंतर खडबडून जागे झालेल्या ठेकेदाराने महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे मुरुम टाकनु त्‍यावर डांबरीकरण करण्याचा प्रयत्‍न सुरु केला आहे. यामुळे वाहनचालकांमध्ये संतत्‍प प्रतिक्रिया व्‍यक्‍त करण्यात येत आहे. याबाबत लोकप्रतिनिधींनी लक्ष घालुन मुरुमाने भरण्यात येणारे खड्डे त्‍वरीत बंद करुन डांबरमिश्रीत खडीनेच खड्डे भरावेत, अशी मागणी नागरिक व वाहन चालकांनी केली आहे. 
राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकठिकाणी मोठमाठे जिवघेणे खड्डे पडले असून या रस्‍त्‍यावरुन वाहन चालवताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. महामागावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन निरपराध नागरिकांचे बळी गेले आहेत. सद्यःस्‍थितीत महामार्गावरील खड्डे बुजण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र, सदरचे खड्डे भरण्यासाठी माती मिश्रीत मुरुमचा वापर करण्यात येत असून त्‍यावर डांबर मिश्रीत खडीचा वापर करण्यात येत असल्‍यामुळे वाहन चालकांमध्ये तीव्र संताप व्‍यक्‍त करण्यात येत आहे. माती मिश्रीत मुरुमामुळे खड्डे भरल्‍यानंतर दोन दिवसातच रस्‍त्‍यांवरील खड्ड्यांची स्‍थिती जैसे थे बनत आहे. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे तसेच रस्‍त्‍याच्‍या चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरु असल्‍यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून वेळ देखील वाया जात आहे. महामार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्‍त्‍यांचे अस्‍तित्‍वच संपुष्टात आले असून रस्‍त्‍यात खड्डे की खड्ड्यांमध्ये रस्‍ता अशी परिस्‍थिती निर्माण झाली आहे. माती मिश्रीत मुरुम टाकुन खड्डे बुजण्याचा प्रयत्‍न म्‍हणजे वाहन चालकांच्‍या जखमेवर मिट चोळण्याचा प्रयत्‍न संबंधितांकडून केला जात असून या गंभीर समस्‍येकडे स्‍थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या दुर्लक्षाबद्दल आश्‍चर्य व्‍यक्‍त करण्यात येत आहे. याबाबत लोकप्रतिनिधींनी त्‍वरीत दखल घेऊन रस्‍त्‍यावर पडलेले खड्डे डांबर मिश्रीत खडीनेच भरण्याच्‍या सुचना संबंतिधांना द्याव्‍यात, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com