Nandurbar Crime News : 39 वर्षांपासून फरारी आरोपीस अटक; नवापूर पोलिसांची कामगिरी | Latest Marathi News | Breaking News Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nandurbar Crime News

Nandurbar Crime News : 39 वर्षांपासून फरारी आरोपीस अटक; नवापूर पोलिसांची कामगिरी

Nandurbar News: खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या तिनटेंबा (ता. नवापूर) येथील आरोपीस अखेर नवापूर पोलिसांनी (Police) अटक केली.

तो गेल्या ३९ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. (Navapur police arrested accused after 39 years who was booked in case of attempted murder nandurbar crime news)

जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी गुन्हे आढावा घेतला असता जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्ह्यांमध्ये आरोपी अटक झालेले नसून ते गुन्हा घडल्यापासून अद्याप फरारी आहेत, असे निदर्शनास आल्यानंतर श्री. पाटील यांनी फरारी व फेरअटक आरोपी पकडण्याकामी विशेष मोहीम राबविण्याबाबत सूचना दिल्या होत्या.

फत्तेसिंग बाबजी मावची (रा. तिनटेंबा, ता. नवापूर) याच्याविरुद्ध नवापूर पोलिस ठाण्यात १२ फेब्रुवारी १९८४ ला गुन्हा दाखल होता. तेव्हापासून आजपावेतो ३९ वर्षांपासून फत्तेसिंग गावित फरारी होता.

सोमवारी (ता. १३) पोलिस अधीक्षक पाटील यांना गुप्त माहिती मिळाली, की फत्तेसिंग मावची हा व्यारा शहरातील एका कापड मिलमध्ये मजुरीला असून, तो त्याची पत्नी व तीन मुलांसह गुजरातमधील तापी जिल्ह्यातील आमली, पोस्ट वझरदा (ता. सोनगड) येथे वास्तव्यास आहे.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

त्यांनी नवापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना सांगितले व श्री. वारे यांनी पथक व्यारा येथे पाठविले. पथकाने व्यारा रेल्वेस्थानक परिसरात सापळा लावून त्याचा शोध घेत असताना त्या ठिकाणी ६० ते ६५ वर्षांचा एकजण फिरताना दिसला.

पथकाने त्यास ताब्यात घेतले. नाव, गाव विचारले असता त्याने फत्तेसिंग मावची (रा. तिनटेंबा, ता. नवापूर, ह.मु. आमली, पोस्ट वझरदा, ता. सोनगड, जि. तापी) असे सांगितले.

तो गुन्ह्यातील फरारी आरोपी असल्याची खात्री झाल्याने त्यास ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात येथे हजर केले आहे. आरोपीला बेड्या ठोकून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पथकास जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दहा हजार रुपये रोख बक्षीस जाहीर केले.

टॅग्स :Nandurbarcrimemurder case