PHOTO : नवी मुंबई-नाशिककरांसाठी मिळणार 'हा' नवीन मार्ग...पाहा..

विक्रांत मते : सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 5 December 2019

नाशिकमधून दररोज हजारो प्रवासी मुंबईला ये-जा करतात. मुंबईपेक्षा वेगाने विकसित होणाऱ्या नवी मुंबईत पोचण्यासाठी मात्र रस्ते हा एकमेव मार्ग आहे. परंतु या मार्गावर कायम वाहतूक ठप्प होत असल्याने नाशिककरांना वेळेच्या दृष्टीने हा मार्ग परवडत नाही. त्यामुळे जलदगतीने जाण्यासाठी ठाण्याचा पर्याय असला, तरी वाहतूक ठप्प झाल्यास तासन्‌ तास अडकून पडावे लागते. पण आता रस्तेमार्गाचा तिसरा पर्याय उपलब्ध होणार आहे.

नाशिक : बिझनेस सेंटर म्हणून विकसित होत असलेल्या नवी मुंबईत नाशिककरांना पोचण्यासाठी आता कल्याण फाट्यापासून नजीक असलेला मानकोली जंक्‍शन हा नवीन पर्याय उपलब्ध होत आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) उल्हास नदीवर पूल उभारण्याचे काम सुरू आहे. या पुलाचे काम पूर्णत्वास आल्यानंतर डोंबिवलीमार्गे थेट नवी मुंबईत प्रवेश करता येईल. भविष्यात नवी मुंबई विमानतळ व मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस-वेवर पोचण्यासाठी हा मार्ग उपयोगाचा ठरणार आहे. 

उल्हास नदीवरील नव्या पुलामुळे नवी मुंबई - नाशिक जोडले जाणार 

नाशिकमधून दररोज हजारो प्रवासी मुंबईला ये-जा करतात. मुंबईपेक्षा वेगाने विकसित होणाऱ्या नवी मुंबईत पोचण्यासाठी मात्र रस्ते हा एकमेव मार्ग आहे. परंतु या मार्गावर कायम वाहतूक ठप्प होत असल्याने नाशिककरांना वेळेच्या दृष्टीने हा मार्ग परवडत नाही. त्यामुळे जलदगतीने जाण्यासाठी ठाण्याचा पर्याय असला, तरी वाहतूक ठप्प झाल्यास तासन्‌ तास अडकून पडावे लागते. पण आता रस्तेमार्गाचा तिसरा पर्याय उपलब्ध होणार आहे. अर्थात, खास नाशिकसाठी पूल बांधला जात नसला तरी नाशिककरांना नवी मुंबई विमानतळावर पोचण्यासाठी याचा उपयोग होईल.

No photo description available.

Photo : मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा मानकोली-मोटागाव लिंक रोड

एमएमआरडीएकडून उभारणीचे काम...एक्‍स्प्रेस-वेवर पोचण्यास मदत,

जेथे शंभर हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावर एकात्मिक नगर वसाहत उभारली जाते तेथे पायाभूत सुविधा शासनाकडून पुरविल्या जातात, त्या अनुषंगाने मोटागाव- मानकोली मार्गावर तीन भव्य प्रकल्प उभारले जात असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई- नाशिक राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या या रस्त्यावर उल्हास नदीवर पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मानकोली जंक्‍शनपासून उल्हास नदीवरील पुलावरून डोंबिवलीमार्गे पनवेल, खारघर, सीबीडी-बेलापूर या नवी मुंबईतील बिझनेस सेंटरमध्ये पोचता येईल. 
 
हेही वाचा > आई फोनवर बोलत होती..अन् बाळ रांगत गेलं बाथरुममध्ये....नंतर आई येऊन बघते तर काय...... 

सध्याची परिस्थिती 
नवी मुंबईत जाण्यासाठी सध्या कल्याण-शिळ किंवा ठाणे शहरातून जाणाऱ्या रस्त्याचा पर्याय आहे. पण या दोन्ही मार्गांवर कायम वाहतूक ठप्प असल्याने तासन्‌ तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. भिवंडीजवळ मुंबई- नाशिक या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर म्हणजे खारेगाव व भिंवडीच्या सेंटरला मानकोली-मोटागाव जंक्‍शन तयार केले जाणार आहे. पुढे उल्हास नदीवर पूल बांधून तिसऱ्या रस्त्याचा पर्याय वाहनधारकांना उपलब्ध होत आहे. कल्याणमार्गे कटकटीचा प्रवास टाळण्यासाठी नाशिकमधून जाणारे प्रवासी ठाणे शहराला वळसा घालून नवी मुंबईकडे जातात. पण वाहतूक ठप्प झाल्यास तीन ते साडेतीन तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. 

वाचा सविस्तर > प्रसुतींच्या कळांनी बिथरली होती 'ती'...त्यातच तिला दिसला 'तो'

विमानतळावर पोचण्यास उपयुक्त..वाहतुकीचा खोळंबा टळणार ​ 
नाशिकमध्ये हवाईसेवा सक्षम नाही. त्यामुळे देशातील इतर शहरांत हवाईमार्गाने जाण्यासाठी मुंबई विमानतळावर जावे लागते. नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाची निर्मिती होत असल्याने नव्याने तयार होणाऱ्या मार्गावरून प्रस्तावित विमानतळावर जलदगतीने पोचता येणार आहे.  

 > भारत भ्रमणावेळी स्वामी विवेकानंदांचा पदस्पर्श  झालेले हेच ते गाव

 > खिचडी खायला मिळणार म्हणून खूश होती मुले....पण त्यावेळी...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai - Nashik will be joined due to new bridge over Ulhas river Nashik Marathi News