'मतभेद बाजूला ठेवून कामाला लागा'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

देवळा - केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतीमालाचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळलेले असताना बघ्याची भूमिका घेणाऱ्या केंद्र व राज्य शासनाला त्यांची जागा दाखवून देण्याची नामी संधी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या माध्यमातून आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सर्व मतभेद बाजूला ठेवून कामाला लागावे व नाशिक जिल्हा परिषदेसह देवळा पंचायत समितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची निर्विवाद सत्ता येण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक समितीचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केले.

देवळा - केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतीमालाचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळलेले असताना बघ्याची भूमिका घेणाऱ्या केंद्र व राज्य शासनाला त्यांची जागा दाखवून देण्याची नामी संधी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या माध्यमातून आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सर्व मतभेद बाजूला ठेवून कामाला लागावे व नाशिक जिल्हा परिषदेसह देवळा पंचायत समितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची निर्विवाद सत्ता येण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक समितीचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केले. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर देवळा तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आज झाला. त्या वेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, नारायण रणधीर यांनीही मनोगत व्यक्त केले. माजी आमदार शांताराम आहेर, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती उषा बच्छाव, "मविप्र'चे संचालक डॉ. विश्राम निकम, प्रांतीक सदस्य योगेश आहेर, उमराणे बाजार समितीचे सभापती विलास देवरे, नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष लक्ष्मीकांत ऊर्फ पिनूदादा आहेर, पक्ष निरीक्षक विजय पवार, माजी सभापती सुकदेव अहिरे, पंचायत समिती सदस्या लीना आहेर, लक्ष्मीबाई शेवाळे, नीलिमा आहेर, जिल्हा सरचिटणीस जगदीश पवार, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील आहेर, युवती कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षा नूतन आहेर, विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक वाघ, निवृत्ती कापसे, डॉक्‍टर्स सेलचे तालुकाध्यक्ष डॉ. संजय निकम, सतीश ठाकरे, धर्मा देवरे, सुभाष देवरे, भाऊसाहेब देवरे, राघो आहेर, जिभाऊ वाघ, शेतकी संघाचे संचालक डॉ. राजेंद्र ब्राह्मणकार, नंदकुमार खरोटे, अतुल आहेर, भावराव अहिरे, महेंद्र आहेर, विनोद देवरे, काशीनाथ अहिरे, नंदीश थोरात, दिलीप आहेर, मुरलीधर आहेर, नारायण जाधव, भिला सोनवणे, नंदलाल निकम, पंडित निकम, संजय साबळे आदी उपस्थित होते. तालुकाध्यक्ष पंडित निकम यांनी प्रास्ताविक केले. 

Web Title: NCP activist melava