'व्होट' आमचे; 'नोट' तुमचीच: राष्ट्रवादी काँग्रेस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीत उमेदवारांसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करते, असा विरोधकांचा नेहमीच आरोप असते. मात्र, जिल्हा परिषद निवडणुकीत उलट परिस्थिती दिसून आली आहे. 'इच्छुक उमेदवारांना निवडणुकीसाठी यावेळी पक्षाकडून कोणताही निधी उपलब्ध होणार नाही, जो काही खर्च होईल, तो तुम्हालाच करायचा आहे,'असे मुलाखती घेतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगिल्याची चर्चा इच्छुक उमेदवारांमध्ये आहे. 

निवडणूक म्हणजे खर्च आलाच. निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवारांसाठी खर्चाच्या मर्यादा दिल्या आहेत. निवडणुकीत खर्च करण्याची प्रत्येक उमेदवारांचीही तयारी असते. मात्र पक्षाकडून निधी मिळण्याचीही अपेक्षा उमेदवारांना असते. या शिवाय काही हाडाचे कार्यकर्ते असतात, त्यांच्याकडे जनतेची ताकद असते, परंतु, निवडणूक लढविण्यासाठी पैसा नसतो. त्यामुळे पक्षाने मोठी मदत करण्याचीही त्यांची अपेक्षा असते. परंतु, आता काळ बदलला आहे. प्रत्येक पक्षात उमेवार केवळ हाडाचा कार्यकर्ता असून चालत नाही, तर तो आर्थिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे, हा सुध्दा उमेदवारीचा निकष असल्याचे दिसते. जळगाव जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नुकत्याच मुलाखती घेण्यात आल्या. जिल्हा प्रभारी दिलीप वळसे पाटील यावेळी उपस्थित होते. इच्छुक उमेवारांच्या जनसंपर्कासमवेत त्यांची आर्थिक सक्षमताही विचारण्यात आली. त्यांना निवडणुकीच्या खर्चाची मर्यादाही सांगण्यात आली आणि वर पक्ष निधी मिळणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आल्याची माहिती इच्छुक उमेदवारांनी दिली. 

निवडणुकीत पैशासाठी फोन करायचाच नाही
'निवडणुकीसाठी पक्षाकहून कोणताही निधी मिळणार नाही, तुम्हाला आम्ही पक्षाचे चिन्ह देवू, मते मिळविण्यासाठी नेत्यांच्या सभा देण्यात येईल, मात्र पक्षाकडून पैसे येतील याबाबत कोणतीही विचारणा करू नये, अगदी जिल्हाध्यक्षांना त्याबाबत दूरध्वनी करून विचारणा करू नये. आपल्या आर्थिक सक्षमतेवरच उमेदवाराने निवडणूक लढवायची आहे. जर आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवार नसेल, त्या ठिकाणी तसा उमेदवार शोधावा,' असेही राष्ट्रवादीतर्फे सांगण्यात आले आहे. निवडणूक खर्चाबाबत नेत्यांनी स्पष्टपणे खुलासा केल्याने त्याबाबत कार्यकर्त्यात आता चर्चा सुरु झाली आहे.

Web Title: NCP asks candidates to bear the election expenses in Jalgaon ZP Elections