छडवेल ग्रामपंचायतीवर 'राष्ट्रवादी-काँग्रेस' आघाडीचा झेंडा

प्रा. भगवान जगदाळे
गुरुवार, 19 एप्रिल 2018

सरपंचपदी शिरीष सोनवणे, तर उपसरपंचपदी अजित बेडसे बिनविरोध..

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परीसरातील अकरा सदस्यीय छडवेल (क) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ग्रामपंचायत सदस्य शिरीष सितु सोनवणे यांची तर उपसरपंचपदी अजित देविदास बेडसे यांची बिनविरोध निवड झाल्याने छडवेल ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचा झेंडा फडकला.

सरपंचपदी शिरीष सोनवणे, तर उपसरपंचपदी अजित बेडसे बिनविरोध..

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परीसरातील अकरा सदस्यीय छडवेल (क) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ग्रामपंचायत सदस्य शिरीष सितु सोनवणे यांची तर उपसरपंचपदी अजित देविदास बेडसे यांची बिनविरोध निवड झाल्याने छडवेल ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचा झेंडा फडकला.

सरपंच-उपसरपंच निवडीसाठी मंगळवारी (ता. १७) अकराला ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा बोलाविण्यात आली होती. तीत ब्राम्हणवेल विभागाचे मंडळाधिकारी आर.एल. सोनार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. तर ग्रामविकास अधिकारी गोकुळ ठाकरे, तलाठी एन.एम. राठोड, श्री. ठाकूर आदींनी त्यांना सहकार्य केले. दरम्यान तहसीलदार संदीप भोसले यांनीही छडवेल ग्रामपंचायतीस भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली.

अकरापैकी एक सदस्य गैरहजर...
दिलेल्या मुदतीत सरपंच व उपसरपंचपदासाठी अनुक्रमे शिरीष सोनवणे व अजित बेडसे यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णयाधिकारी श्री. सोनार यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. ग्रामपंचायत सदस्या प्रीतबाई पिंपळे व संगीता बोरसे हे अनुक्रमे सूचक होते. निवडणूक प्रक्रियेदरम्यान अकरापैकी दहा सदस्य हजर होते. त्यात नवनिर्वाचित सरपंच शिरीष सोनवणे, उपसरपंच अजित बेडसे यांच्यासह संगीता बोरसे, सुशीला पवार, गीता सोनवणे, अण्णा पवार, सिंधुबाई बेडसे, रतीलाल माळचे, जयनाबाई सोनवणे, प्रीतबाई पिंपळे यांचा समावेश आहे. तर ग्रामपंचायत सदस्य प्रमोद बेडसे गैरहजर होते.

राष्ट्रवादी व काँग्रेसचे वर्चस्व...
बिनविरोध निवडीसाठी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, माजी कृषी सभापती सचिन बेडसे, पंचायत समितीचे माजी उपसभापती नितीन बेडसे, पंडित बेडसे, विनोद बेडसे, गोकुळ साळुंखे आदींसह गटनेते, ज्येष्ठ मार्गदर्शक व ग्रामपंचायत सदस्यांनी विशेष प्रयत्न केले.

यावेळी माजी उपसरपंच शिवाजी बेडसे, संभाजी बेडसे, प्रा.डॉ.रवींद्र ठाकरे, बालू बेडसे, गुलाब बेडसे, हेमंत बेडसे, जीवन बेडसे, अनिल बेडसे, प्रभाकर बेडसे, गणेश निकम, मच्छीन्द्र सोनवणे, सागर सोनवणे, जितेंद्र बेडसे, दादा चौधरी, बाबा साळुंखे, भटु बेडसे, पंकज साळुंखे आदींनी परिश्रम घेतले. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांचा यावेळी सत्कार करण्यात आला. आगामी काळात गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहू अशी प्रतिक्रिया सरपंच, उपसरपंचांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp congress alliance flag on Chadwel gram panchayat