‘राष्ट्रवादी’ जिल्हाध्यक्षपदी देवकर, की ॲड. पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि ॲड. रवींद्र पाटील यांच्यापैकी कुणाची निवड होणार, याचा फैसला उद्या (ता. २९) होण्याची शक्‍यता आहे. आगामी महापालिका, लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही निवड होत असल्याने जिल्ह्याचे या निवडीकडे लक्ष लागले आहे.

जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि ॲड. रवींद्र पाटील यांच्यापैकी कुणाची निवड होणार, याचा फैसला उद्या (ता. २९) होण्याची शक्‍यता आहे. आगामी महापालिका, लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही निवड होत असल्याने जिल्ह्याचे या निवडीकडे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नवीन जिल्हाध्यक्ष निवडीसाठी पक्षनिरीक्षक निरीक्षक रंगनाथ काळे यांच्या अध्यक्षतेखाली शहरात नुकतीच बैठक झाली. जिल्हाध्यक्ष पदासाठी आमदार डॉ. पाटील यांच्यासह नऊ जणांची नावे आली आहेत.  जिल्हाध्यक्षपदासाठी एकापेक्षा अधिक नावे आल्यामुळे पक्षनिरीक्षक रंगनाथ काळे यांनी नाव जाहीर न करता प्रदेश स्तरावरून अध्यक्षाचे नाव जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले. उद्या (ता. २९) पुण्यात पक्षाच्या नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड होणार आहे. त्यानंतर जळगाव जिल्हाध्यक्षांची निवडही जाहीर करण्यात येणार आहे.

अनुभवींना प्राधान्य
आगामी निवडणुकांचे आव्हान पाहता जिल्ह्यातील माहीतगार व अनुभवी व्यक्तीला अध्यक्षपदी नियुक्त केले जाईल. माजी मंत्री गुलाबराव देवकर व ॲड. रवींद्र पाटील हे दोन अनुभवी नेते इच्छुकांच्या यादीत आहेत. दोघांनीही यापूर्वी पक्षाचे जिल्हाध्यक्षपद सांभाळले आहे. निवडणुकांचाही त्यांचा अनुभव आहे. त्यामुळे सध्या तरी दोघांची नावे चर्चेत आहेत. त्यातही देवकरांकडे हे पद जाण्याची शक्‍यता अधिक आहे.

हे आहेत इच्छुक...
माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा बॅंक संचालक संजय पवार, भुसावळ येथील राजेंद्र चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, भाजपमधून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले अमळनेर येथील अनिल भाईदास पाटील, धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस किसान मोर्चाचे सोपान पाटील आणि पक्षाचे विद्यमान कार्यालय अध्यक्ष विलास भाऊलाल पाटील हे अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत.

Web Title: NCP district president selection Gulabrao Devkar Ravindra Patil politics