#Loksabha2019 : दिंडोरी तालुक्यातील युवक राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार...?

dindori.jpg
dindori.jpg

वणी (नाशिक) : राष्ट्रवादी कांँग्रेस पक्षात प्रामाणिकपणे काम करुन एकनिष्ठ राहाणाऱ्या कार्यकर्त्यांचा कुठलाही विचार न करता फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी कार्यकर्त्यांचा वापर करुन घेतला जात असल्याचा आरोप करीत दिंडोरी तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सचिन देशमुखांसह तालुक्यातील शेकडो नाराज कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने दिंडोरी तालुक्यात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. 

येथील जगदंबा माता मंदीर सभागृहात शुक्रवारी सायंकाळी साडे सातवाजता दिंडोरी तालुक्यातील राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या नाराज गटाची बैठक संपन्न झाली. या बैठकीस राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष सचिन देशमुख, वणी शहराध्यक्ष अमोल देशमुख, माजी राष्ट्रवादी विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष सुहास देशमुख, लखमापूरचे उपसरपंच बाळासाहेब देशमुख, वणीचे माजी उपसरंपच किरण गांगुर्डे, सुनिल थोरात, गणेश देशमुख, सतिश जाधव, माजी तालुका सरचिणीस संतोष गांगुर्डे, घनशाम देशमुख, नितीन देवकर, सागर बोरस्ते, विलास पाटील, योगेश झोळेकर, सागर पगारे, संदीप बोरस्ते, अतुल वाघ आदी  उपस्थित होते.

बैठकीत काही कार्यकर्त्यांनी पक्षात आलेल्या कटु अनुभव व झालेल्या अन्यायाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. यात बैठकीत पक्ष म्हणून नाही तर पक्षाने अन्याय केलेल्या व्यक्तीच्या पाठीमागे उभे राहाण्याचा सुर बैठकीत उमटला आहे. याबाबत बैठकीत दिंडोरीचे माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या बाजुने उभे राहाण्याचा निर्णय घेतला असून चारोस्करांनी 8 एप्रिलला बोलावलेल्या मेळाव्यात आपली भुमिका स्पष्ट करणार आहे. या बैठकीस गोरख देशमुख, नारायण थोरात, गुलाब जाधव, श्रावण मेसाट, दिपक आहेर, अल्केस साबद्रा, सुरज देशमुख, शरद सुर्यवंशी आदीसह तालुक्यातील विविध ठिकाणांहून शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान या बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांचा कल हा राष्ट्रवादीने लोकसभेचे टिकीट नाकारलेल्या व भाजपात प्रवेश करुन महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविणाऱ्या डॉ. भारती पवार यांना पाठींबा देण्याकडे दिसून आला असून हे कार्यकर्ते शिवसेनेत की भाजपात प्रवेश करणार हे येत्या 8 एप्रिल स्पष्ट होणार आहे. 

दरम्यान, या बैठकीसाठी उपस्थित असलो तरी माझा वैयक्तिक राष्ट्रवादी पक्ष व तालुका नेतृत्वावर विश्वास असल्याने  राष्ट्रवादी कांग्रेसमध्येच कार्यरत राहाणार असल्याचे अंबानेरचे सरपंच संतोष रेहरे व समता परीषदेचे वणी शहराध्यक्ष दुर्गेश चित्तोडे यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com