दुष्काळमुक्ती, महागाईविरोधात राष्ट्रवादीचा निफाड तहसीलवर धडक मोर्चा

दुष्काळमुक्ती, महागाईविरोधात राष्ट्रवादीचा निफाड तहसीलवर धडक मोर्चा

निफाड : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप शिवसेनेच्या फसव्या सरकारविरोधात एल्गार पुकारत माजी आमदार दिलीप बनकर यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळमुक्ती आणि वाढती महागाईसह विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मोर्चा काढण्यात आला.

आज दुपारी एक वाजता निफाड तहसील कार्यालयावर मोर्चा धडक काढत राष्ट्रवादीच्या वतीने तालुक्यातील प्रश्नावर आक्रमक होत आपल्या मागण्यांचे निफाडचे प्रांत महेश पाटील, तहसीलदार दीपक पाटील यांना निवेदन  देण्यात आले. निफाड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने दुष्काळ मुक्तीसाठी निफाड येथील बाजार समिती आवारातून दुपारी एक वाजता मोर्चाला सुरवात झाली. हा मोर्चा माजी आमदार दिलीप बनकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. हा मोर्चा निफाड बसस्थानक, न्यायालय मार्गाने तहसील कचेरीवर येताच मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.

निफाड तालुका खड्डेमुक्त झालाच पाहिजे, पेट्रोल-डिझेल दरवाढ रद्द झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना दिवसभर वीज मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, अशा आशयाचे फलक घेऊन कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणला होता. 

माजी आमदार दिलीप बनकर, जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, सुभाष जाधव, अश्पाक शेख यांनी आपल्या भाषणातून तालुक्यातील शेडींग कमी करणे. जळालेले ट्रान्सफार्मर त्वरित मिळावे, निफाड तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, नाशिक जिल्ह्याला पुढील काळात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे, यासाठी उपलब्ध पाण्याचे व्यवस्थित नियोजन व्हावे, भविष्यात होणाऱ्या पाणी टंचाईबाबत त्वरित आवश्यक ती पाऊले उचलावीत, तालुक्यातील प्रमूख रस्ते, गाव रस्ते व शेतीमाल वाहतूक रस्ते तातडीने दुरुस्ती व्हावे, स्वाईन फ्ल्यूसारखे संसर्गजन्य रोगावर त्वरित योग्य त्या उपाययोजना राबवाव्या, पेट्रोल व डिझेलचे दर कमी करावेत  आदी विषयांवर घणाघाती भाषने केलीत त्यानंतर  मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर, सिद्धार्थ वनारसे , गणेश बनकर सुरेश खोडे, माधव ढोमसे , विलास बोरस्ते , अश्विनी मोगल , अजय गवळी , बाबासाहेब शिंदे , गोकुळ गिते निवृती धनवटे, विजय कारे, संजय मोरे, नंदकुमार कदम, सागर कुंदे , राजेंद्र बोरगुडे , भुषन धनवटे, अनिल बोरस्ते अश्पाक शेख ,भुषन शिंदे ,राकेश अवारे,नवनाथ बोरगुडे , शिवाजी बोरगुडे, संजय वाळुंज, शैलेंद्र वाळुंज नगरसेवक देवदत कापसे , ज्ञानेश्वर खाडे,  महेश चोरडीया, सचिन जाधव,  संजय जैतमाल, दत्ता रायते, संदीप गवारे, अनिल सोनवणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, शेतकरी, शेतमजूर व कार्यकर्ते  उपस्थितीत होते.

''निफाड तालुक्यातील दुष्काळाची परिस्थीती भयावह आहे. पीकं करपली, शेतमालाला भाव नाही, शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला असताना आता तर त्यांच्या हक्काच्या पाण्यावर गदा येण्याची वेळ आली आहे. सरकारने आम्हाला उपाशी ठेऊन दुसऱ्याचे पोट भरण्याचा प्रयत्न केल्यास तो संपूर्ण ताकदीने हाणून पाडत निफाड तालुक्यातून जायकवाडीला थेंबभर पाणी जाऊ देणार नाही. तसेच वाढती महागाई आणि दुष्काळाबाबत सरकारला जाब विचारणार''

- दिलीप बनकर, माजी आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com