राष्ट्रवादीच्या सदस्यांचा चाळीसगाव पंचायत समितीच्या सभेवर बहिष्कार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

चाळीसगाव : तालुक्‍यात शौचालयांच्या झालेल्या कामांची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्याची मागणी वारंवार करुन चौकशी समिती नेमली जात नाही, यासह इतर विविध कारणांवर येथील पंचायत समितीच्या मासिक सभेवर आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाचही सदस्यांनी बहिष्कार टाकला. विशेष म्हणजे, सत्ताधारी भाजपचे दोनच सदस्य आजच्या बैठकीला उपस्थित होते. 

येथील पंचायत समिती मासिक सभा आज दुपारी तीनला सुरु झाल्यानंतर आपण वेळोवेळी मागणी करुनही कुठलीच माहिती दिली जात नाही असे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी सभेवर बहिष्कार टाकून पंचायत समितीतून काढता पाय घेतला. 

यासंदर्भात पत्रकारांना माहिती देताना माजी उपसभापती लताबाई दौंड यांच्यासह राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सांगितले, की आम्हाला ग्रामस्थांनी ज्या विश्वासाने पंचायत समितीत त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठवले आहे, ते प्रश्नच सुटत नाही. खेड्यापाड्यातून लोक भाडे खर्चुन आपल्या कामांसाठी पंचायत समितीत येतात, मात्र त्यांना गटविकास अधिकारीच भेटत नाही. विस्तार अधिकारी देखील हजर नसतात. सभापतींनी कार्यालयात नियमितपणे उपस्थित राहणे गरजेचे असताना त्या देखील नियमित येत नाहीत. मिटिंग टू मिटिंग त्या येतात, परिणामी लोकांची कामेच होत नाहीत.

29 ऑक्‍टोबर 2018 ला झालेल्या मासिक सभेत गटनेते अजय पाटील यांच्यासह सदस्यांनी पंचायत समितीच्या कृषी, पाणीपुरवठा आदी सहा विभागांची लिखीत स्वरुपात माहिती मागितली होती. मात्र, एकाही अधिकाऱ्याने माहिती दिलेली नाही. गटविकास अधिकाऱ्यांचा येथील कर्मचाऱ्यांवर कुठलाच वचक राहिलेला नाही. लोक घरकुलासह गोठाशेड व विहिरींच्या कामासाठी या कार्यालयात आल्यानंतर त्यांची कामेच होत नाहीत. अहिल्यादेवी होळकर विहिर सिंचन योजनेंतर्गत 481 विहिरींना प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. मात्र, त्यांचा अद्यापपर्यंत कार्यारंभ आदेश मिळालेले नाहीत.

परिणामी, या कामांची चौकशी करावी, अशी मागणी करुनही साधी चौकशी होत नाही. नवीन विहिरींच्या उद्दिष्ठांबाबतही कुठलीच माहिती सदस्यांना दिली जात नाही. अनेक गावांमध्ये ग्रामसेवक अद्यापही नियुक्त केलेले नाहीत. ज्या गावांना आहेत, त्यापैकी बऱ्याच गावांमध्ये ते ग्रामसेवक नियमित जात नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनी कामे होत नसल्याने या प्रकाराला गटविकास अधिकाऱ्यांसह सत्ताधारी लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचा आरोप या सदस्यांनी केला. याप्रसंगी अजय पाटील, शिवाजी सोनवणे, केदार पाटील, सुनील पाटील आदी सदस्य उपस्थित होते. दरम्यान, सभापती स्मितल बोरसे यांना याबाबत विचारणा केली असता, राष्ट्रवादीचे पाचही सदस्य सभेला उपस्थित होते. त्यामुळे त्यांनी बहिष्कार टाकला असे म्हणता येणार नाही. शौचालयांच्या चौकशीसाठी आम्ही समिती नियुक्त करणार आहोत असे सांगितले.

Web Title: NCP Members leaves meeting of Chalisgaon Panchayat samiti