मुख्यमंत्र्यांकडे डॅशिंग रसासन, जाणाऱ्यांनो सावध राहा: सुप्रिया सुळे

Supriya Sule
Supriya Sule

नाशिक : 'सध्या पक्ष बदलणं मोबाईलमधील सीम कार्ड बदलण्यासारखे झाले आहे. थोडं कोणी जास्त दिल की तिकडे जातात. आता पॅकेजिंग बदललं म्हणून आतला माल बदलणार आहे का?'', असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी सध्या सुरु असलेल्या पक्षांतराला उद्देशून केला. 'ईडी', 'सीबीआय'ने आजवर चांगले काम केले आहे. त्या मुळे त्याविषयी मला कशाला भीती वाटेल? माझ्या हातून चूक होऊ नये, म्हणून मी खबरदारी घेते, असेही त्या म्हणाल्या.

खासदार सुप्रिया सुळे नाशिक दौऱ्यावर असून आज त्यांनी नाशिक पश्‍चिम मतदारसंघात संवाद कार्यक्रम घेतला. नागरीकांशी बोलतांना त्या म्हणाल्या, ''सध्या पक्षात पडझड झाली तरी 'हेडलाईन' मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच असतो. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज ठाकरे यांच्यावर या सगळ्यांचेच खूप प्रेम आहे. एक आमदार नाही खासदार नाही पण तरी टीव्ही राज ठाकरे 72 तास टीहीवर दिसत होते. बाकी कोणाची 'ईडी'कडून चौकशी झाली नाही का? पण वाहिन्यांना इंटरेस्ट फक्त राज ठाकरेंमध्येच असतो.'' 

''नाशिकशी आमचं जिव्हाळ्याचं नात आहे. नाशिकशी असलेलं हे प्रेमाचं नात मी शेवटपर्यंत जपेन. महाराष्ट्रात नाशिक हे सुशिक्षित, पुरोगामी शहर म्हणून ओळख आहे. छगन भुजबळांनी घडवलेले बदल आपण अनुभवले आहेत. छगन भुजबळांच्या संघर्षाच्या काळात जिल्ह्याने त्यांना साथ दिली. मात्र आज चित्र वेगळे आहे. नवरा ऑफिसमधून घरी आल्यावर बायको विचारते 'नोकरी आहे की नाही?' बॉश, महिंद्रा, सारख्या कंपन्यांमध्ये कामगारांची कपात होत आहे. हे सरकार याबाबत पुर्णतः असंवेदनशील आहे." असेही सुळे यांनी सांगितले.

''मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारायचा मला अधिकार आहे. त्यांना मी विचारले....आमचा माणूस तुमच्याकडे आला की स्वच्छ होतो का? तुमच्याकडे कोणती वशिंग पावडर आहे?... त्यावर मुख्यमंत्री म्हणतात आमच्याकडे डॅशिंग रसायन आहे....लक्षात ठेवा सगळी रसायने चांगली नसतात. त्यामुळे त्यांच्याकडे जाणाऱ्यांनो सावध रहावं. तुमच्यावर कोणतं रसायन टाकतील ते बघा आणि सांभाळा.'' अशीही खोचक टीका त्यांनी केली. 

रसायनांचा विकास हवा की आमचा विकास हवाय असा प्रश्‍न विचारुन त्या म्हणाल्या, "त्यांचा विकास रसायनांचा आहे म्हणून नाशिक मध्ये नोकऱ्या जात आहेत. नाशिककरांनो तुमचा बायोडेटा मला पाठवा. मी मुख्यमंत्रयांकडे पाठवते आणि नोकऱ्या लावा सांगते. मुख्यमंत्र्यानी नोकऱ्या लावल्या तर मी स्वतः त्यांचे आभार मानेन" 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com