सव्वा कोटीच्या नोटांसह राष्ट्रवादीचा पदाधिकारी ताब्यात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

नाशिक - जुन्या चलनातील हजार व पाचशेच्या बनावट नोटांची छपाई करून त्या नोटा बदलून देण्यासाठी कमिशनवर व्यवहार करणाऱ्या 11 जणांना नाशिक पोलिसांनी एक कोटी 35 लाख रुपयांच्या बनावट नोटांसह अटक केली. यात 1 लाख 80 हजार रुपयांच्या खऱ्या नोटा आहेत. प्राप्तिकर विभाग आणि आडगाव पोलिस यांनी ही संयुक्त कारवाई केली. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकऱ्याचादेखील समावेश असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली. यात नाशिक आणि मुंबईमधील पाच आणि पुणे जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. 

प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाशिक पोलिसांना दिलेल्या माहितीच्या आधारे गरजूंना कमिशन देऊन गुरुवारी मध्यरात्री त्यांच्याकडून नवीन नोटा स्वीकारणार असल्याची माहिती दिली होती. पोलिसांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जत्रा हॉटेलसमोर सापळा रचला असता मध्यरात्री धुळ्याकडून येणाऱ्या तीन गाड्यांमधून संशयितांना बनावट नोटांसह ताब्यात घेत त्यांच्याकडून सुमारे 1 कोटी 35 लाख रुपयांच्या हजार व पाचशेच्या बनावट नोटांसह सुमारे 20 लाख रुपये किमतीच्या तीन गाड्याही जप्त केल्या. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नाशिक शहर पदाधिकारी छबू दगडू नागरे (खुटवडनगर, नाशिक), रामराव तुकाराम पाटील (महात्मानगर, नाशिक), संदीप संपतराव सस्ते (मुकुंदनगर, पुणे), रमेश गणपत पांगारकर (रा. सिन्नर, नाशिक), ईश्‍वर मोहनभाई परमार (मिरारोड, मुंबई), राकेश सरोज कारखुर (महात्मा फुलेनगर, ठाणे), नीलेश सतीश लायसे (भाईंदर, मुंबई), संतोष भिवा गायकवाड (दिंडोरी रोड, म्हसरुळ, नाशिक), गौतम चंद्रकांत जाधव (खारघर नवी मुंबई), प्रभाकर केवल घरटे (सावरकरनगर नाशिक), प्रवीण संजयराव मांढरे (चांदीवली अंधेरी, मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या सर्वांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: NCP office bearers 1.25 million notes