‘राष्ट्रवादी’त आहे अन्‌ ‘राष्ट्रवादी’तच राहणार - छगन भुजबळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

‘कोण कुठे चाललेय हे मला माहीत नाही. माझ्याबद्दल निश्‍चिंत राहा. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि इथेच राहणार आहे,’ असा निर्वाळा पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज येथे दिला. देवसाने-मांजरपाडा वळण योजनेद्वारे बोगद्यातून दुष्काळी भागाला जाणाऱ्या पाण्याच्या पूजनासाठी निघण्याची तयारी सुरू असताना भुजबळांच्या शिवसेनेच्या चर्चेला सुरवात झाली. त्या संबंधाने भुजबळांनी पत्रकारांशी संवाद साधला.

नाशिक - ‘कोण कुठे चाललेय हे मला माहीत नाही. माझ्याबद्दल निश्‍चिंत राहा. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि इथेच राहणार आहे,’ असा निर्वाळा पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज येथे दिला. देवसाने-मांजरपाडा वळण योजनेद्वारे बोगद्यातून दुष्काळी भागाला जाणाऱ्या पाण्याच्या पूजनासाठी निघण्याची तयारी सुरू असताना भुजबळांच्या शिवसेनेच्या चर्चेला सुरवात झाली. त्या संबंधाने भुजबळांनी पत्रकारांशी संवाद साधला.

देवसाने-मांजरपाडा प्रकल्पाच्या यशावरून लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेना प्रवेशाची टूम काढली असण्याची शक्‍यता व्यक्त करत भुजबळांनी शिवसेनेतील माझ्या प्रवेशाच्या चर्चेत तथ्य नाही, असे स्पष्ट केले. तसेच सचिन अहिर हे मुंबईतील माझगावमध्ये काही वर्षांपासून शेजारी असल्याने कदाचित त्यांच्यासमवेत माझे नाव जोडले गेले असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, असेही त्यांनी म्हटले. शिवसेनेने प्रवेशासाठी ‘ऑफर’ दिली आहे काय, या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी आम्ही आणि शिवसेनाही कुणाला ‘ऑफर’ देत नसल्याचे सांगितले. भुजबळ यांनी शिवसेनेला रामराम ठोकल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे वितुष्ट आले होते. मात्र कालांतराने त्यांच्यातील दरी कमी झाली. मात्र, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भुजबळांचे पुतणे समीर यांचा शिवसेनेने पराभव केला आहे. हा पराभव भुजबळांच्या जिव्हारी लागल्याचे बोलले जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Party chhagan bhujbal Politics