"राष्ट्रवादी'चा रास्ता रोको; कॉंग्रेसचा थाळीनाद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

मालेगाव - केंद्राच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे स्वतःच्याच पैशासाठी सर्वसामान्य नागरिक याचकाप्रमाणे बॅंकांच्या रांगेत उभा आहे. दोन महिने उलटल्यानंतरही परिस्थिती सामान्य झाली नाही. या निर्णयामुळे कामगार व शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. येत्या आठवड्यात परिस्थितीत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी आज येथे दिला. नोटाबंदीच्या निर्णयानंतर 60 दिवस होत आले असतानाही नागरिकांच्या अडचणी दूर होत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलनप्रसंगी मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल बोलत होते. 

दरम्यान, महिला कॉंग्रेसतर्फे आज येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माजी आमदार रशीद शेख व माजी महापौर ताहेरा शेख यांच्या नेतृत्वाखाली थाळीनाद आंदोलन झाले. आंदोलनकर्त्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. ताहेरा शेख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांनी कार्यालयासमोर थाळीनाद केला. मोदींनी जनतेची फसवणूक केली. त्यांचा निर्णय फसला आहे. काळा पैसा उघडकीस आलाच नाही. महिलांचा घरगुती खर्चाचा पैसा बॅंकेत गेला. दोन महिने झाल्याने पैसे काढण्यावरील मर्यादा उठवावी. जमा झालेल्या रकमेचा व काळ्या पैशाचा हिशेब द्यावा, अशी मागणी कॉंग्रेसने केली. 

या आंदोलनात यास्मीन कलीम अहमद, अंजुम शेख, सुरय्या रफीक, सलमा जजोरोद्दीन, शकिलाबानो पीर मोहंमद आदींसह बहुसंख्य महिला सहभागी झाल्या. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसने मौलाना मुफ्ती, तालुकाध्यक्ष गुलाबराव चव्हाण, युवक अध्यक्ष विनोद शेलार, दिनेश ठाकरे, अरुण देवरे, आर. के. बच्छाव, डॉ. जयंत पवार, विनोद चव्हाण आदींच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. नोटाबंदीमुळे यंत्रमागासह सर्वच व्यवसाय ठप्प झाले. शेतकरी त्रस्त असून, सामान्य नागरिक आर्थिक विवंचनेत आहेत, असे मत विविध वक्‍त्यांनी सांगितले. आंदोलनात स्थायी समिती सभापती एजाज बेग, युसूफ इलियास, साबीर टेलर, किशोर इंगळे, धर्मा भामरे, महेश शेरेकर, संदीप पवार, दीपक साळवे, योगेश निकम, प्रशांत महाजन, अतहर अश्रफी, सिकंदर राजा, परिक्षित बच्छाव, पंकज चौधरी आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Ncp rasta rokho & congress thalinad