राष्ट्रवादीतर्फे उमेदवार निवडीसाठी तालुका पातळीवरील समित्यांची घोषणा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

नाशिक - राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे प्रत्येक तालुक्‍यात जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार ठरविण्यासाठी, तसेच समविचारी पक्षांबरोबर आघाडी करण्यासाठी निवड समित्यांची रचना जाहीर केली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार निवड समितीप्रमुख श्रीराम शेटे यांच्या अध्यक्षतेखाली आज निवड समिती सदस्यांची बैठक होऊन त्यात प्रत्येक तालुक्‍याचे प्रभारी व पक्षनिरीक्षक यांची नावे जाहीर करण्यात आली. 

नाशिक - राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे प्रत्येक तालुक्‍यात जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार ठरविण्यासाठी, तसेच समविचारी पक्षांबरोबर आघाडी करण्यासाठी निवड समित्यांची रचना जाहीर केली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार निवड समितीप्रमुख श्रीराम शेटे यांच्या अध्यक्षतेखाली आज निवड समिती सदस्यांची बैठक होऊन त्यात प्रत्येक तालुक्‍याचे प्रभारी व पक्षनिरीक्षक यांची नावे जाहीर करण्यात आली. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसने डॅमेज कंट्रोलसाठी ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांच्याकडे उमेदवार निश्‍चितीचे अधिकार दिले आहेत. या समितीमध्ये जिल्हाध्यक्ष, पक्षाचे आमदार, पक्षाचे जिल्हा प्रभारी यांच्यासह सर्व सेलच्या जिल्हाध्यक्षांचा समावेश असणार आहे. या समितीची आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात बैठक झाली. बैठकीला सर्व तालुकाप्रमुखही उपस्थित होते. बैठकीत उमेदवार निश्‍चित करण्याचे अधिकार तालुका पातळीवर देण्याचा निर्णय झाला. तसेच आघाडी करण्याचा अधिकारही तालुकापातळीवर देण्याचा निर्णय झाला. यासाठी प्रत्येक तालुक्‍याला प्रभारी व पक्षनिरीक्षक यांची नावेही जाहीर झाली. जिल्हा निवड समितीप्रमाणेच तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांचा समावेश या तालुका समितीमध्ये असणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पगार यांनी दिली. श्री. पगार म्हणाले, की या तालुका समित्यांच्या बैठका 18 ते 19 पर्यंत होऊन त्यात स्थानिक पातळीवर उमेदवार ठरविले जातील. उमेदवारांची नावे शक्‍यतो तालुका पातळीवरच निश्‍चित करावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याच पद्धतीने स्थानिक पातळीवर समविचारी पक्षांच्या आघाडीबाबतचेही धोरण असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या आजच्या बैठकीला श्रीराम शेटे, जिल्हाध्यक्ष पगार, आमदार नरहरी झिरवाळ, आमदार जयवंत जाधव, आमदार दीपिका चव्हाण, माजी आमदार उत्तम भालेराव, नाना महाले, विष्णुपंत म्हैसधुणे, भगीरथ शिंदे, साहेबराव पाटील, राजेंद्र भोसले, रंजन ठाकरे, दिलीप खैरे, सचिन पिंगळे, दीपक वाघ, शोभा मगर, राजेंद्र जाधव, डॉ. योगेश गोसावी, नितीन मोहिते, रामदास पाटील आदी उपस्थित होते. 

तालुकावर प्रभारी व निरीक्षक 
तालुकावार प्रभारी व निराक्षक याप्रमाणे (कंसात तालुका) : आमदार जयवंत जाधव, चेतन कासव (येवला), आमदार नरहरी झिरवाळ, नामदेव वाकचौरे (पेठ), अर्जुन टिळे, उत्तम आहेर (नाशिक), दत्तात्रेय पाटील, डॉ. योगेश गोसावी (कळवण), राजेंद्र भोसले, सचिन देशमुख (चांदवड), निवृत्ती कापसे, सोमनाथ खातळे (बागलाण), मायावती पगारे, गोरख बलकवडे (नांदगाव), नीलेश पटेल, राजेंद्र जाधव (निफाड), ज्ञानेश्‍वर फोकणे, सचिन पिंगळे (सुरगाणा), प्रल्हाद जाधव, शोभा मगर (सिन्नर), जगदीश पवार, शरद गायधनी (दिंडोरी), नंदकुमार कदम, नितीन मोहिते (त्र्यंबकेश्‍वर), राजेंद्र सोनवणे, दीपक वाघ (इगतपुरी), हरिभाऊ जाधव, विजय पवार (देवळा), सुनील कबाडे, विलास सानप (मालेगाव). 

Web Title: NCP for selection by the district level committees announced