बंधाऱ्यांमधील गाळ तातडीने काढण्याची गरज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

येवला - अवर्षणप्रवण व दुष्काळी तालुक्यातील अनेक गावात मागील ३० वर्षात विविध योजनांतून मोठ्या संख्येने बंधारे, तलाव बांधण्यात आले. परंतु, अनेक तलावातील गाळ बंधारे निर्मीतीनंतर काढलेला नसल्याने पाणी साठवण्याला मर्यादा येत आहे, त्यामुळे गाळ काढून सर्व बंधाऱ्यांना झळाळी देण्याची गरज निर्माण झाली आहे. गावोगावी कृषी व लपाच्या योजनांतून काही बंधाऱ्यातील गाळ काढणे सुरू आहे. मात्र मोथे बंधारे 'जैसे थे' आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधत काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा रश्मी पालवे यांनी बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना याबाबत निवेदन दिले. 

तालुक्यातील सर्वात मोठे असलेले सावरगाव, खिर्डीसाठे व डोंगरगाव येथील साठवण बंधारे कोरडे पडले आहेत. त्यातील पाणी पूर्णपणे आटल्याने गाळ व माती कोरडी झाली आहे. सध्या गाळ काढण्यास अनुकुल वातावरण आहे. येत्या तीन महिन्यात बंधाऱ्यातील माती व गाळ काढणे शक्य होईल. गाळ काढल्याने बंधाऱ्याची पाणी साठवण्याची क्षमता वाढेल. शेतकर्यांना येत्या पावसाळ्यानंतर जास्त प्रमाणात पाणी उपलब्ध होईल. त्यामुळे भविष्याचा फायदा विचारात घेऊन प्राधान्यांने गाळ काढण्याची मागणी पालवे यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

पत्राच्या प्रती जलसंधारण, ग्रामविकास मंत्री तसेच जिल्हाधिकारी, मुख्य अभियंता जलसंधारण आदींना दिल्या आहेत. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन सदर पत्राची प्रत सूपुर्द केली असून, त्वरीत कारवाईची मागणी पालवे यांनी केली. यावेळी डॉ.भास्कर पालवे, संजय मिस्त्री, भाऊ लहरे व कांचन पालवे आदी उपस्थित होते.

Web Title: need to remove the mud sludge