डॉक्‍टरांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची गरज - विक्रम गोखले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 जून 2019

नाशिकः डॉक्‍टरांची काहीही चुक नसताना बेशिस्तपणे, झुंडशाहीने त्यांना मारहाण केली जाते. लाठ्याकाठ्या घेऊन डॉक्‍टरांसोबतच दुसऱ्या रूग्णांनाही त्रास दिला जातो. तोडफोड केली जाते. या प्रकारांमुळे आजचा सुशिक्षित, सेवाव्रती डॉक्‍टर निष्कारण भरडला जात आहे. त्यांच्यामध्ये भिती निर्माण होत आहे. अशा डॉक्‍टरांना मानसिक आधार देण्याची गरज आहे आणि त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले पाहिजे, असे मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आज (ता.23) नाशिकमध्ये व्यक्त केले.

     रावसाहेब थोरात सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचलित श्री गुरूजी रूग्णालय यांच्यातर्फे झालेल्या "श्री गुरूजी रूग्णालय ः संकल्पनातून... सिद्धीकडे...' या वंदना अत्रे लिखित पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल भालेराव होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक हेमंत राठी, श्री गुरूजी रूग्णालयाचे अध्यक्ष डॉ. विनायक गोविलकर, सचिव प्रवीण बुरकुले, डॉ. अनंत पंढरे उपस्थित होते.
     श्री. गोखले म्हणाले, की रूग्णांना जगवण्यासाठी डॉक्‍टर तयार होत असतात. केवळ पैशाने सामाजिक कार्य होत नाही तर त्याला वेळ द्यावा लागतो आणि डॉक्‍टरांची ही नवीन पिढी चांगले काम उभे करते आहे. आजूबाजूचे राजकारण आणि इतर ठिकाणी ज्या गोष्टी घडतात ते पाहून मनाला दुःख होते. तर दुसरीकडे या डॉक्‍टरांचे काम पाहून समाधान लाभते. माझे बालपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये (आरएसएस) गेले. आरएसएसमध्ये शिस्त आहे, समाजासाठीचा विचार आहे. या रूग्णालयातील डॉक्‍टर खरे देव आहे. कसलीही अपेक्षा न ठेवता त्यांनी स्वतःला रूग्णसेवेशी जोडून घेतले आहे.
     वंदना अत्रे यांनी सांगितले, की 2008 ते 2018 या कालावधीतील मी बराचसा काळ रूग्णालयात घालवला. रूग्ण म्हणून तिथला अनुभव घेतला. परिस्थितीचा अभ्यास केला. वैद्यकीय व्यवहार समजून घेतले. या काळातील अनुभव या पुस्तकात मांडले आहेत. प्रत्येक कलाकृतीला एक चौकट असते पण या पुस्तकातील आशय काळाच्या पलिकडचा आहे. प्रास्ताविक विनायक गोविलकर यांनी केले. सुत्रसंचालन सोनाली तेलंग यांनी केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The need to stand firm with a doctor -Vikram Gokhale